Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 यहूदाची कन्या जुलमामुळे व बिकट दास्यामुळे बंदिवान होऊन गेली आहे; ती राष्ट्रांमध्ये राहत आहे, तिला चैन नाही; तिचा पाठलाग करणार्‍या सर्वांनी तिला संकटावस्थेत गाठले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 दारिद्र्य आणि जुलमामुळे यहूदा दास्यपनात बंदिवान झाली आहे. ती राष्ट्रंमध्ये राहत आहे, पण तिला आराम मिळत नाही. तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला तिच्या अत्यंत निराशेच्या मनस्थितीत तिला संकटावस्थेत गाठले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पीडा व कठोर परिश्रम केल्यानंतर यहूदाह बंदिवासात गेली आहे. ती अन्य राष्ट्रांमध्ये राहते; आता तिला कुठेही आराम मिळत नाही. जे तिचा पाठलाग करीत असत, त्यांनी तिच्या पीडित परिस्थितीत तिला मागे टाकून दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:3
22 Iomraidhean Croise  

शहरात राहिलेले अवशिष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फितून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक ह्यांना गारद्यांचा नायक नबुजरदान ह्याने कैद करून नेले.


बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.


मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.


तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग करून त्याला यरीहोच्या मैदानात गाठले व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.


दक्षिणेतील नगरे बंद पडली आहेत ती उघडायला कोणी नाही; यहूदाला सर्वस्वी बंदिवान करून नेले आहे, तो पूर्णपणे बंदिवान झाला आहे.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते त्यांना पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारींतून त्यांना हुसकून काढून त्यांची शिकार करतील.


पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील.


तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांना कैद करून बाबेलास नेले.


मग गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने देशातले अगदी कंगाल लोक, नगरात उरलेले अवशिष्ट लोक, फितूर होऊन बाबेलच्या राजाच्या पक्षास मिळालेले लोक व अवशिष्ट राहिलेले कारागीर ह्या सर्वांना बंदिवान करून नेले.


तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग केला; त्यांनी सिद्कियाला यरीहोच्या मैदानात गाठले, व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.


तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत; त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत; तिचा राजा व तिचे सरदार नियमशास्त्र नसलेल्या राष्ट्रांत आहेत; तिच्या संदेष्ट्यांनाही परमेश्वरापासून काही दृष्टान्त होत नाही.


“दूर व्हा! अमंगळ लोकहो, दूर व्हा! दूर व्हा! शिवू नका!” असे त्यांनी त्यांना ओरडून म्हटले; ते पळून जाऊन भटकत राहिले तेव्हा राष्ट्रांतले लोक म्हणाले, “त्यांना आतापासून येथे वस्ती करायची नाही.”


आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत; आम्ही शिणलो आहोत, आम्हांला विश्रांती नाही.


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतींत गरजवंत होऊन, ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल; तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूं ठेवील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan