Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्यांची सर्व दुष्टता तुझ्यापुढे येवो; तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर; कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्यांची सर्व दुष्टाई तुझ्यासमोर येवो, माझ्या पापांमुळे तू माझ्याशी जसा वागलास तसाच तू त्यांच्याशी वाग. कारण माझे कण्हणे पुष्कळ आहे आणि माझे हृदय दुर्बल झाले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “त्यांची सर्व दुष्कृत्ये तुमच्यापुढे येवोत; माझ्या सर्व पापांमुळे तुम्ही माझ्याशी जसा व्यवहार केला तसाच त्यांच्याशीही करा. माझे उसासे खूप आहेत व माझे हृदय मूर्छित झाले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:22
16 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्‍यांसारखा होईन.


“ह्यांचा देव कोठे आहे,” असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्यादेखत राष्ट्रांना कळू दे.


ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे;


जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाहीत त्यांच्यावर तू आपल्या संतापाचा मारा कर. कारण त्यांनी याकोबाला ग्रासून टाकले आहे, त्याला खाऊन टाकले आहे, त्याचे वसतिस्थान उद्ध्वस्त केले आहे.


हे परमेश्वरा, मला मारण्याचे त्यांचे सर्व मनसुबे तू जाणतोसच; त्यांच्या दुष्कर्माची क्षमा करू नकोस, आपल्या दृष्टीपुढून त्यांचे पातक पुसून टाकू नकोस; म्हणजे ते तुझ्यापुढे ठोकर खाऊन पडतील; तुझ्या क्रोधसमयी त्यांची अशी वाट लाव.


तुला ग्रासून टाकणार्‍या सर्वांना ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील; तुझे हरण करणार्‍यांचे हरण होईल, तुला लुटणार्‍या सर्वांना मी लुटवीन.


सीयोननिवासिनी म्हणो, ‘माझ्यावर व माझ्या शरीरावर केलेला जुलूम बाबेलवर उलटो;’ व यरुशलेम म्हणो, ‘माझ्या रक्तपाताचा दोष खास्दी देशाच्या रहिवाशांवर असो.’


हायहाय! माझ्या दुःखाचे सांत्वन मला करता आले असते तर बरे होते! माझे हृदय माझ्या ठायी म्लान झाले आहे.


त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.


ह्यामुळे आमचे हृदय खचले आहे; ह्या गोष्टीमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत;


ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल?”


म्हणून मी विनंती करतो की, तुमच्याप्रीत्यर्थ मला होणार्‍या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हांला भूषणावह आहेत.


ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan