Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्‍यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मी कण्हत आहे हे त्यांनी ऐकले आहे. माझे सांत्वन करायला कोणी नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझे अनिष्ट ऐकले आहे. तू असे केल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. जो दिवस तू नेमला आहे तो तू आणशील तेव्हा ते माझ्यासारखे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “लोकांनी माझे कण्हणे ऐकले आहे, पण माझे सांत्वन करण्यास कोणीही नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझ्या संकटांबद्दल ऐकले आहे तुम्ही जे केले ते पाहून त्यांना आनंद झाला आहे; तुम्ही घोषणा केलेला दिवस येवो म्हणजे ते देखील माझ्यासारखेच होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:21
37 Iomraidhean Croise  

मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला; ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले; त्यांनी माझी निंदा एकसारखी चालवली.


प्रभू दुर्जनाला हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे हे त्याला दिसते.


मी म्हणालो, “तू ऐकले नाहीस तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल. माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील.”


जो क्रोधाने लोकांचे सतत ताडन करीत असे, जो कोपाने अनिवार छळ करून राष्ट्रांवर सत्ता चालवत असे, तो दुर्जनांचा सोटा, अधिपतींचा दंड, परमेश्वराने मोडून टाकला आहे.


तुला ग्रासून टाकणार्‍या सर्वांना ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील; तुझे हरण करणार्‍यांचे हरण होईल, तुला लुटणार्‍या सर्वांना मी लुटवीन.


इस्राएल तुझा हास्यविषय नव्हता का? तो चोरांमध्ये आढळला काय? जेव्हा जेव्हा तू त्याची गोष्ट काढावीस तेव्हा तेव्हा तू आपली मान हलवावीस.


माझे वतन लुटणार्‍यांनो, तुम्ही जरी हर्ष व उल्लास करीत आहात, मळणी करणार्‍या कालवडीप्रमाणे बागडत आहात, मजबूत घोड्यांप्रमाणे खिंकाळत आहात,


त्याच्यावर चोहोकडून रणघोष करा, त्याने हार खाल्ली आहे; त्याची तटबंदी पडली आहे, त्याचे कोट पाडले आहेत. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे : त्याच्यावर सूड उगवून घ्या, त्याने केले तसे त्याला करा.


बाबेलवर तिरंदाज, सर्व धनुर्धारी ह्यांना जमवा; त्याच्या सभोवती तळ द्या; त्याचा काही निभाव लागू देऊ नका; त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या; जे सर्व त्याने केले तसे त्याला करा; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरवला आहे.


हे गर्विष्ठा! पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो; कारण तुझा दिवस, मी तुझा समाचार घेण्याची वेळ आली आहे.


बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.


बाबेलने जसे इस्राएलाचे वधण्यात आलेले लोक पाडले, तसे बाबेलात सर्व पृथ्वीवरचे वधण्यात आलेले लोक पाडण्यात येतील.


ह्या सर्वांमुळे मी रडत आहे; माझा डोळा, माझा डोळा अश्रू ढाळत आहे; कारण माझ्या जिवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे; माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे.”


ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.


त्यांची सर्व दुष्टता तुझ्यापुढे येवो; तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर; कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.”


पर्वणीस जाणारे कोणी नाहीत म्हणून सीयोनेचे मार्ग शोक करीत आहेत; तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकत आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत; ती स्वतः कष्टी आहे.


यरुशलेमेने घोर पातक केले आहे; म्हणून ती किळसवाणी झाली आहे; जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती उसासे टाकते, तिने पाठ फिरवली आहे.


येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”


तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्यावर आपले तोंड पसरले आहे; ते धुत्कारून दात खातात; ते म्हणतात, “आम्ही त्याला गिळून टाकले आहे; खरोखर ह्याच दिवसाची आम्ही अपेक्षा करीत होतो; आम्हांला हा दिवस लाभला, हा आम्ही पाहून चुकलो.”


“मानवपुत्रा, सोर यरुशलेमेविषयी म्हणत आहे, ‘अहा! जी केवळ राष्ट्रांचे प्रवेशद्वार अशी होती ती मोडून गेली आहे आणि आता लोकप्रवाह माझ्याकडे वळला आहे; ती उजाड झाली आहे, म्हणून आता माझी भरभराट होणार आहे;’


लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोर्‍यात लोकांच्या झुंडी आहेत. कारण निर्णयाच्या खोर्‍यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे.


‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan