विलापगीत 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 हे परमेश्वरा, पाहा, मी किती संकटात आहे! माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे; माझ्या मनाची खळबळ झाली आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर पाहावे तर तलवार मला निर्वंश करते, आत पाहावे तर मृत्यू आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हे परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! कारण मी दु:खी झाले आहे. माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे. माझे मन माझ्यामध्ये उलटले आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर तलवार निर्वंश करते, तर घरांत मृत्यू आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “हे याहवेह, माझ्या वेदना पाहा! माझे अंतःकरण यातनाग्रस्त झाले आहे, आणि माझे हृदय अस्वस्थ झाले आहे. कारण मी अत्यंत बंडखोर झाले होते. बाहेर तलवार मला मृत्यू आणते; आत तर केवळ मरणच आहे. Faic an caibideil |