Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडले आहे; माझे अपराध एकत्र गुंफले आहेत; ते माझ्या मानेला लागले आहेत; त्याने माझे बळ खचवले आहे; ज्यांच्यापुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 माझ्या पुष्कळ अपराधांचे जू त्याने आपल्या हाताने जखडले आहे. ते एकत्र गुंफले आहेत, आणि ते माझ्या मानेवर आले आहेत; त्यांनी माझी शक्ती निकामी केली आहे. ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही, अशांच्या हाती परमेश्वराने मला दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत; त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत. ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत, आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे. मी ज्यांचा सामना करू शकत नाही, त्यांच्या हाती मला दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:14
21 Iomraidhean Croise  

दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो.


मी आपल्या देशात अश्शूरचा चुराडा करीन, माझ्या पर्वतांवर त्याला पायांखाली तुडवीन; तेव्हा त्याचे जूं त्यांच्यावरून निघेल, त्यांच्या खांद्यांवरून त्याचे ओझे उतरेल.”


मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


ह्या सर्व वचनांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी म्हणालो की, “बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान द्या, त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा जे राष्ट्र व राज्य करणार नाही आणि बाबेलच्या राजाच्या जोखडाला मान देणार नाही, अशा राष्ट्राचा त्याच्या हातून मी अंत करीपर्यंत तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी मी समाचार घेईन.


जा, हनन्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन.1


कारण सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या सर्व राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवले आहे; त्यांना त्याची सेवा करावी लागेल, मी त्याला वनातले पशूही दिले आहेत.”’


यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने त्याला अटकेत टाकले तेव्हा तो त्याला म्हणाला होता की, “तू असा संदेश का देतोस की परमेश्वर म्हणतो, पाहा, मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देतो, व तो ते हस्तगत करील;


आणि तो सिद्कीयाला बाबेलास नेईल व मी त्याचा समाचार घेईन तोवर तो तेथे राहील, असे परमेश्वर म्हणतो; तुम्ही खास्द्यांशी लढला तरी तुमची सरशी होणार नाही?”


मग सिद्कीया राजाने त्याला बोलावून आणले; तेव्हा राजाने आपल्या राजवाड्यात त्याला एकान्ती विचारले की, “परमेश्वराकडचे काही वचन आहे काय?” यिर्मया म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “आपणांला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल.”


मी तुम्हांला त्यातून बाहेर काढीन, तुम्हांला परदेशीयांच्या हाती देईन व तुम्हांला न्यायदंड करीन.


मी आपल्या कोपाचा वर्षाव तुझ्यावर करीन, माझ्या कोपाग्नीचा मी तुझ्यावर फुंकर घालीन आणि राक्षसी व नाश करण्यात कुशल अशा मनुष्यांच्या हाती मी तुला देईन.


प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, ज्यांचा तू द्वेष करतेस त्यांच्या स्वाधीन तुला मी करीन, ज्यांच्यावरून तुझे मन उडाले आहे त्यांच्या हाती तुला देईन;


म्हणून पाहा, मी पूर्वेकडील लोकांना तुझा ताबा देईन, ते तुझ्यात छावणी करून राहतील व आपली घरे बांधतील; ते तुझ्यातली फळे खातील व तुझे दूध पितील.


म्हणून पाहा, मी आपला हात तुझ्यावर उगारीन, मी तुला राष्ट्रांच्या हाती लूट म्हणून देईन, तुझा राष्ट्रांतून उच्छेद करीन, देशांमधून तुला नाहीसे करीन, तुला मी नष्ट करीन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.


कारण मी एफ्राइमास सिंहासारखा व यहूदाच्या घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी फाडून टाकीन आणि परत जाईन, तो मीच; मी त्याला घेऊन जाईन, आणि सोडवणारा कोणी असणार नाही.


म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे; त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही; तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे.


म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतींत गरजवंत होऊन, ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल; तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूं ठेवील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan