Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्याने वरून माझ्या हाडात अग्नी पाठवला आहे, आणि तो त्याजवर प्रबल होतो. त्याने माझ्या पायांसाठी जाळे पसरवीले आहे आणि मला मागे वळवले आहे. त्याने मला सतत ओसाड व दुर्बल केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्यांनी उच्च स्थानातून अग्नी पाठविला आहे व तो माझ्या हाडांमध्ये जळत आहे. त्यांनी माझ्या पावलात सापळा पसरविला आहे व मला मागे वळविले आहे. त्यांनी मला उद्ध्वस्त केले आहे, मी दिवसभर मूर्छित होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:13
31 Iomraidhean Croise  

तो आपल्या पायांनी जाळ्यात अडकतो, तो पाशात पाऊल टाकत आहे.


तर हे लक्षात ठेवा की देवानेच माझा विपरीत न्याय केला आहे; त्याने माझ्यावर आपले जाळे टाकले आहे.


माझी त्वचा काळी होऊन गळून पडत आहे; माझी हाडे तापाने जळजळत आहेत.


जे कोणी सीयोनेशी वैर करतात ते फजीत होवोत आणि मागे फिरोत.


गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला)


मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे.


कारण माझे आयुष्य शोकात, माझी वर्षे उसासे टाकण्यात गेली आहेत; माझ्या दुष्टाईने माझी शक्ती क्षीण झाली आहे, माझी हाडे जीर्ण झाली आहेत.


माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.


माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे.


तू आम्हांला जाळ्यांत गुंतवले; तू आमच्या कंबरेला भारी ओझे बांधले.


मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडीसुद्धा खावीत.


जे कोरीव मूर्तींवर भाव ठेवतात, ओतीव मूर्तींना “तुम्ही आमचे देव आहात” असे म्हणतात, ते उलथून पडतील व अगदी लज्जित होतील.


ह्यामुळे माझा संताप व क्रोध ह्यांचा वर्षाव झाला, तो यहूदाची नगरे व यरुशलेमेच्या आळ्या ह्यांत पेटला; ती ओसाड व वैराण झाली आहेत हे आज दिसत आहे.


त्यांची सर्व दुष्टता तुझ्यापुढे येवो; तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर; कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.”


त्याने मला वाटेवरून लोटून देऊन माझे फाडून तुकडे केले आहेत; त्याने मला उदास केले आहे.


ह्यामुळे आमचे हृदय खचले आहे; ह्या गोष्टीमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत;


मी त्याच्यावर आपले जाळे टाकीन म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन; पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल.


मी आपले जाळे त्याच्यावर टाकीन; तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास नेईन; त्याने माझ्याबरोबर केलेल्या विश्वासघातासंबंधाने तेथे मी त्याची झडती घेईन.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी बहुत राष्ट्रांच्या द्वारे तुझ्यावर आपले जाळे टाकीन; ते तुला माझ्या जाळ्याने बाहेर ओढून काढतील.


ते जातील तेव्हा त्यांच्यावर मी आपले जाळे टाकीन, आकाशातल्या पाखरांप्रमाणे त्यांना खाली पाडीन; त्यांच्या मंडळीने ऐकले आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.


त्या राष्ट्रांत तुला स्वास्थ्य मिळणार नाही, तुझ्या पायांना विसावा मिळणार नाही; तेथे तुझे हृदय थरथर कापत राहील, तुझे डोळे क्षीण होतील व तुझा जीव झुरत राहील, असे परमेश्वर करील;


तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.


कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan