Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 “येणार्‍याजाणार्‍यांनो, हे पाहून तुम्हांला काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले; ह्या माझ्या दु:खासारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्षपूर्वक पाहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 “जे तुम्ही जवळून जाता, तुम्हास काहीच वाटत नाही काय? पण जरा माझ्याकडे निरखून पाहा. परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले, या माझ्या दु:खा सारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्ष देऊन पाहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 या वाटेच्या वाटसरूंनो माझी दुर्दशा पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही काय? मला जे दुःख देण्यात आले आहे, त्या माझ्या दुःखासारखे दुसरे दुःख आहे काय? याहवेहने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी ही वेदना माझ्यावर लादली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:12
18 Iomraidhean Croise  

तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे; तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे.


मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल.


हायहाय! मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे! तरी मला वाटते, “हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे म्हणून मला ते सोसले पाहिजे.”


अशा प्रकारे ते आपला देश दहशत व निरंतरचा उपहास ह्यांना पात्र करतात; त्याच्याजवळून येणारा-जाणारा प्रत्येक जण विस्मित होऊन आपले डोके हलवील.


पाहा, परमेश्वरापासून क्रोधरूप तुफान सुटले आहे; धुव्वा उडवणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.


परमेश्वर आपले कार्य संपवीपर्यंत व आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत त्याचा संतप्त क्रोध मागे फिरणार नाही; हे पुढील काळात तुम्हांला समजेल.”


हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल.


म्हणून तुम्ही कंबरेस गोणपाट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा; कारण आमच्यावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही.”


इस्राएल तुझा हास्यविषय नव्हता का? तो चोरांमध्ये आढळला काय? जेव्हा जेव्हा तू त्याची गोष्ट काढावीस तेव्हा तेव्हा तू आपली मान हलवावीस.


“परमेश्वर न्यायपरायण आहे, मी तर त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आहे; अहो सर्व लोकहो, आता ऐका, माझे दुःख पाहा; माझ्या कुमारी व माझे तरुण बंदिवान होऊन गेले आहेत.


हायहाय! प्रभू सीयोनकन्येस क्रोधरूप अभ्राने कसा वेष्टत आहे! त्याने इस्राएलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे; त्याने आपल्या संतापाच्या दिवशी आपल्या पादासनाचे स्मरण केले नाही.


मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?


त्याने आमच्यावर मोठे अरिष्ट आणले; जी वचने तो आमच्याविरुद्ध व आमचा न्याय करणार्‍या न्यायधीशांविरुद्ध बोलला ती त्याने प्रत्ययास आणून दिली आहेत; यरुशलेमेवर जशी विपत्ती आली तशी सर्व जगावर कधी आली नाही.


अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे; पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही.


कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट’ त्या काळी येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan