Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 वैर्‍याने तिच्या सर्व रम्य वस्तूंवर आपला हात फिरवला आहे. विदेशी तिच्या पवित्रस्थानात आले हे तिने पाहिले आहे; त्यांनी तुझ्या समाजात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूंनी आपला हात ठेवला आहे. परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभास्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरीही, तिने त्यांना तिच्या पवित्रस्थानात जाताना पाहिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तिच्या सर्व संपत्तीवर तिच्या शत्रूंनी हात टाकला आहे. परकीय राष्ट्रांनी तिच्या पवित्र मंदिरात प्रवेश करताना तिने बघितले होते— तुम्ही निषिद्ध केलेल्यांनी तुमच्या सभास्थानात प्रवेश केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:10
22 Iomraidhean Croise  

देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला.


त्या दिवशी मोशेचा ग्रंथ लोकांना वाचून दाखवण्यात आला; त्यात हे लिहिलेले आढळले की अम्मोनी अथवा मवाबी ह्यांना देवाच्या मंडळीत येण्यास मनाई आहे;


तुझ्या पवित्र लोकांनी केवळ थोडा काळ वतन भोगले; आमच्या शत्रूंनी तुझे पवित्रस्थान तुडवून टाकले आहे.


“तुझ्या सर्व पातकांमुळे तुझ्या सर्व हद्दींतील तुझे वित्त व निधी मी मोबदला न घेता लूट म्हणून देईन.


नगरातले सर्व निधी, त्यातली सर्व कमाई, त्यातल्या सर्व मोलवान वस्तू व यहूदाच्या राजांची सर्व भांडारे मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन, आणि ते ती लुटून बाबेलास घेऊन जातील.


गंगाळसागर, स्तंभ, गंगाळाच्या बैठकी व इतर पात्रे ह्या नगरात उरली होती त्यांविषयी सेनाधीश परमेश्वर ह्याप्रमाणे म्हणतो,


ही जी पात्रे परमेश्वराच्या मंदिरात, यहूदाच्या राजगृहात व यरुशलेमेत राहिली होती त्यांविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो की,


बाबेल देशातून जे पळून निभावून जात आहेत त्यांचा ध्वनी ऐका; तो ध्वनी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडून सूड, त्याच्या मंदिराविषयीचा सूड, सीयोनास कळवत आहे.


‘निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत; परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्रस्थानात परके आले आहेत; म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत.’


त्याने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसांत आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करते; जुलूम करणार्‍याच्या हाती तिचे लोक लागले तेव्हा तिला कोणी साहाय्यकर्ता नव्हता; तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडली.


तुम्ही मला अन्न, चरबी व रक्त अर्पण करताना मनाने व शरीरानेही बेसुंती अशा परक्या लोकांना माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. ह्याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये भर घातली आहे.


मी आपले तोंड त्यांच्यापासून फिरवीन म्हणजे ते लोक माझे भांडार भ्रष्ट करतील; लुटारू त्यात शिरून ते भ्रष्ट करतील.


त्याने त्यांना म्हटले, “मंदिर भ्रष्ट करा; अंगणे वधलेल्यांनी भरून टाका; चला, निघा.” तेव्हा त्यांनी जाऊन नगरात संहार चालवला.


[दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला] ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जेथे नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.


अम्मोनी आणि मवाबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये;


कारण तुम्ही मिसर देशाहून येत असताना ते अन्नपाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत, एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून अराम-नहराईम1 येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan