Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करारमदार करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्यास व इस्राएल लोकांस म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करार करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे आले. ते यहोशुआला आणि इस्राएली लोकांना म्हणाले, “आम्ही दूरच्या देशातून आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर शांतीचा करार करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:6
9 Iomraidhean Croise  

तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला,


मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ती माणसे काय म्हणाली व ती तुझ्याकडे कोठून आली होती?” हिज्कीयाने उत्तर दिले, “ती दूर देशाहून माझ्याकडे आली होती.”


मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथे छावणीकडे परतला.


हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरला मदतीचा हात आखडता घेऊ नकोस; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.”


पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे डेरे दिले.


इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.


त्यांनी आपल्या पायांत झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले, अंगात जुनेपुराणे कपडे चढवले; त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरसल्या होत्या.


त्यांनी त्याला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan