Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांनी आपल्या पायांत झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले, अंगात जुनेपुराणे कपडे चढवले; त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरसल्या होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे आणि अंगात जुनेपुराणे कपडे घातले; त्यांच्या खाण्याच्या सर्व भाकरी वाळलेल्या आणि बुरसटल्या होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यांनी अंगात जीर्ण झालेले कपडे व पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले आणि त्यांच्या शिदोर्‍यांत शिळ्या वाळलेल्या व बुरशी लागलेल्या भाकरी होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:5
7 Iomraidhean Croise  

पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,


मी तुम्हांला चाळीस वर्षे रानातून चालवले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायांतील पायतणे झिजली नाहीत.


तुझे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत; तुझे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहो.’


ह्या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा ऊनऊन होत्या; पण आता त्या वाळून बुरसल्या आहेत.


हे द्राक्षारसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटूनतुटून गेले आहेत; हे आमचे कपडे व आमचे जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.”


तेव्हा आपल्यापरीने त्यांनीही कपटाची युक्ती योजली; त्यांनी प्रवासासाठी शिधासामग्री घेतली1 आणि आपल्या गाढवांवर जुनी गोणपाटे व झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले;


ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करारमदार करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan