Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा आपल्यापरीने त्यांनीही कपटाची युक्ती योजली; त्यांनी प्रवासासाठी शिधासामग्री घेतली1 आणि आपल्या गाढवांवर जुनी गोणपाटे व झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा त्यांनी फसवेगिरीची योजना केली; त्यांनी राजदुतांप्रमाने वर्तणूक केली, आणि आपल्या गाढवावर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, शिवलेले द्राक्षरसाचे बुधले घेतले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा त्यांनी एका युक्तीचे अवलंबन केले: ते यहोशुआकडे प्रतिनिधी म्हणून गेले, गाढवांवर जुनी गोणपाटे आणि झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:4
12 Iomraidhean Croise  

आपली बहीण दीना शखेमाने भ्रष्ट केली म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून त्याला व त्याचा बाप हमोर ह्याला उत्तर दिले.


धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात.”


कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यांत घालतात.”


अन्यायी कारभार्‍याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्या-सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.


ह्या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा ऊनऊन होत्या; पण आता त्या वाळून बुरसल्या आहेत.


हे द्राक्षारसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटूनतुटून गेले आहेत; हे आमचे कपडे व आमचे जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.”


यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले,


त्यांनी आपल्या पायांत झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले, अंगात जुनेपुराणे कपडे चढवले; त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरसल्या होत्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan