Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 नंतर इस्राएल लोक कूच करत तिसर्‍या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे ही : गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 नंतर इस्राएल लोक कूच करीत तिसऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे गिबोन, कफीरा, बैरोथ व किर्याथ-यारीम.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तेव्हा इस्राएली लोक बाहेर पडले आणि तिसर्‍या दिवशी ते त्यांच्या शहरांकडे आले: गिबोन, कफीराह, बैरोथ आणि किर्याथ-यआरीम ही त्या शहरांची नावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:17
24 Iomraidhean Croise  

शौलाच्या पुत्राजवळ दोन पुरुष सेनानायक होते; एकाचे नाव बाना व दुसर्‍याचे नाव रेखाब. हे बन्यामिनी वंशातला रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र. बैरोथ हे नगरही बन्यामिन्यांच्या प्रांतात मोडत आहे.


गिबोनी इश्माया हा तिसांतला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता; आणि यिर्मया, यहजिएल, योहानान, गदेराचा योजाबाद,


ही कालेबाची संतती होय. एफ्राथेच्या पोटचा ज्येष्ठ पुत्र होर, ह्याचा पुत्र किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल हा होता.


किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल ह्याच्या वंशात हारोवे व अर्धे मनुहोथवासी हे झाले.


किर्याथ-यारीम ह्याची कुळे : इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई; ह्यांच्यापासून सराथी व एष्टाबुली ही निघाली.


मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या वेळेस गिबोन येथल्या उच्च स्थानी होती.


किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथ ह्यांतले लोक सातशे त्रेचाळीस,


किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथ येथील माणसे सातशे त्रेचाळीस.


परमेश्वराच्या नामाने संदेश सांगणारा असाच आणखी एक मनुष्य होता, त्याचे नाव उरीया; हा किर्याथ-यारीमकर शमायाचा पुत्र; यिर्मयाने सांगितलेल्या सर्व वचनांप्रमाणेच त्याने ह्या नगराविरुद्ध व ह्या देशाविरुद्ध संदेश दिला.


तेव्हा त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानीसारखे होते; ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते.


किर्याथ-बाल (हेच किर्याम-यारीम) व राब्बा; ही दोन नगरे व त्यांखालील खेडी.


तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झर्‍यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून तेथून बाला उर्फ किर्याथ-यारीम येथपर्यंत पोहचते.


तेथून मग पश्‍चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहूदाचे नगर किर्याथ-बाल उर्फ किर्याथ-यारीम येथे जाते; ह्याची पश्‍चिम सीमा हीच.


दक्षिणेकडील सीमा पश्‍चिमेकडे सुरू होऊन किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नफ्तोह पाणवठ्यावर जाते;


त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत.


पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण मंडळीच्या सरदारांनी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व मंडळीने सरदारांविरुद्ध कुरकुर केली.


यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले,


त्यांनी त्याला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे;


त्यांनी कूच करून यहूदातील किर्याथ-यारीम येथे तळ दिला. ह्यामुळे त्या स्थळाला आजपर्यंत महाने-दान (दानाची छावणी) असे म्हणतात. ते किर्याथ-यारीमच्या पश्‍चिमेस आहे.


मग त्यांनी किर्याथ-यारीमच्या लोकांकडे जासूद पाठवून सांगितले की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा.”


ह्यावरून किर्याथ-यारीमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी ठेवला; आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार ह्याला पवित्र केले. शमुवेल इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करतो


Lean sinn:

Sanasan


Sanasan