Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तुम्ही ते नगर हस्तगत केल्यावर त्याला आग लावा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करा; मी तुम्हांला आज्ञा केली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तुम्ही ते नगर काबीज करताच त्यास आग लावा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्याचे पालन करा; पाहा, मी तुम्हाला आज्ञा केली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जेव्हा ते शहर तुम्ही हाती घ्याल, तेव्हा याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे तुम्ही त्या शहरास आग लावून द्यावी. लक्षात घ्या; तुम्हाला मी आज्ञा दिलेल्या आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:8
12 Iomraidhean Croise  

अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद देऊन ठेवली होती की, “सावध राहा, अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हांला इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा, काही भिऊ नका; मी तुम्हांला हुकूम करतो आहे ना? हिंमत धरा, शौर्य दाखवा.”


पण तुझा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांची जी नगरे तुला वतन म्हणून देत आहे त्यांतला कोणताही प्राणी जिवंत ठेवू नकोस.


तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “जे काही करण्याची तू आम्हांला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हांला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ.


मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”


मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली.


ह्याप्रमाणे नगराच्या उत्तरेस कोणते सैन्य जायचे आणि पश्‍चिमेस कोणी दबा धरायचा हे ठरवून यहोशवा त्या रात्री खोर्‍यात राहिला.


यरीहो आणि त्याचा राजा ह्यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा ह्यांचे कर; मात्र तेथील हाती लागेल ती मालमत्ता व गुरेढोरे तुम्ही आपल्यासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव.”


त्यांच्याशी सामना करायला ती दुसरी टोळीही नगरातून निघाली; असे ते दोहो बाजूंनी इस्राएलाच्या कचाट्यात सापडले; इस्राएलाने त्यांचा संहार केला; त्यांच्यातला कोणी जिवंत राहिला नाही किंवा निसटून गेला नाही.


तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला; आजपर्यंत तो तसाच आहे.


मग तुम्ही दबा धरणार्‍यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे.


मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्‍चिम बाजूला बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकां-बरोबरच राहिला.


तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?


Lean sinn:

Sanasan


Sanasan