Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 इस्राएलाच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरे ह्यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या; त्यांतला एकही शब्द त्याने गाळला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 इस्राएलाच्या संबध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरी यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखविल्या; त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 यहोशुआने संपूर्ण इस्राएली मंडळी, स्त्रिया आणि मुलेबाळे आणि जे परदेशीय त्यांच्यामध्ये राहत होते यांना, मोशेने दिलेल्या सर्व आज्ञातील वाचून दाखविण्यात आल्या, एकही शब्द न वाचता सोडला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:35
15 Iomraidhean Croise  

एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करत असता इस्राएल स्त्रीपुरुष व मुलेबाळे ह्यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला; लोक धायधाय रडत होते.


तेव्हा मंडळीतील स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने नियमशास्त्राचा ग्रंथ आणला.


त्यातील वचने त्याने पहाटपासून दोन प्रहरपर्यंत पाणीवेशीसमोरच्या चौकात स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली, आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला.


त्यांच्याबरोबर एक मिश्र समुदायसुद्धा गेला; तशीच शेरडेमेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली.


“परमेश्वर म्हणतो : परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा, व यहूदाच्या सर्व नगरांतून जे परमेश्वराच्या मंदिरात भजनपूजन करण्यास येतात त्यांना जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांना सांग, एकही शब्द गाळू नकोस.


लोकांना जमवा. मंडळी शुद्ध करा; वडिलांना जमवा; मुले व स्तनपान करणारी अर्भके ह्यांनाही एकत्र करा; वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणार्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, ‘आम्ही तुमच्याबरोबर येतो, कारण देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”’


ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.


कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.


मग असे झाले की, ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो; तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.


तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज उभे आहात; तुमचे प्रमुख, तुमचे वंश, तुमचे वडील जन आणि तुमचे अंमलदार व सर्व इस्राएल लोक,


तुमची मुलेबाळे, तुमच्या स्त्रिया व लाकूडतोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे आज ह्यासाठी उभे आहेत की,


तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हांला यश मिळावे म्हणून ह्या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा.


सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरा ह्यांना जमव, म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील, आणि ह्या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील;


जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका, अशासाठी की, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan