यहोशवा 8:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणार्या लेवीय याजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अंमलदार आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरे हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांना प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे निम्मे लोक गरिज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 परमेश्वराचा कराराचा कोश वाहणाऱ्या लेवी याजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अधिकारी आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरी हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांस प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे याने पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे निम्मे लोक गरीज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 सर्व इस्राएली लोक, त्यांच्या वडीलजनांसह, अधिकारी आणि न्यायाधीश हे सर्व याहवेहच्या कराराच्या कोशाच्या दोन्ही बाजूंना उभे होते, ज्या लेवीय याजकांनी तो वाहून आणला त्यांच्यासमोर ते होते. त्यांच्यामध्ये राहणारे परदेशी आणि तिथे जन्मलेले लोक तिथे होते. जशी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने पूर्वी दिली होती, त्याप्रमाणे अर्धे लोक गरिज्जीम पर्वतासमोर आणि अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे राहिले, इस्राएली लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्याने या सूचना दिल्या होत्या. Faic an caibideil |