यहोशवा 8:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने इस्राएल लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे, अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली; त्या दगडांना लोखंडाचा स्पर्शदेखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वराला होमबली अर्पण केले आणि शांत्यर्पणे वाहिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परमेश्वराचा सेवक मोशे याने इस्राएल लोकांस आज्ञा केल्याप्रमाणे, “अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथांत लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली.” त्या दगडांना लोखंडाचा स्पर्शदेखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वरास होमबली अर्पिले आणि शांत्यर्पणाचे यज्ञ केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली. Faic an caibideil |