Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार पराक्रमी वीर निवडून रातोरात पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार, बलवान, व शूर पुरुष निवडून घेतले आणि त्यांना रात्री पाठवून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा यहोशुआ आणि सर्व सैन्य आय नगरावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडले. त्याने सर्वोत्कृष्ट तीस हजार योद्धे निवडले आणि त्यांना रात्री पाठवून दिले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:3
10 Iomraidhean Croise  

तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, “आपल्यांतले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर; उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.”


आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल.


तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन


तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पाहा, वर आला आहे, त्याला सामोर्‍या चला.’


कारण तुम्हा स्वत:ला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.


तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर ह्यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.


यरीहो आणि त्याचा राजा ह्यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा ह्यांचे कर; मात्र तेथील हाती लागेल ती मालमत्ता व गुरेढोरे तुम्ही आपल्यासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव.”


त्याने त्यांना अशी आज्ञा केली की, “ऐका, नगराच्या पिछाडीस जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा.


तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1


म्हणून तुम्ही आपल्याबरोबरच्या लोकांसहित रात्री निघून या आणि बाहेर शेतात दबा धरून बसा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan