Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिले व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून उतरवून नगराच्या वेशीजवळ टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली; ती आजपर्यंत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिली व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून काढून नगराच्या वेशीजवळ फेकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली. ती आजपर्यंत तशीच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 यहोशुआने आय शहराच्या राजाचे शव एका झाडाला टांगून ठेवले आणि संध्याकाळपर्यंत ते तसेच सोडून दिले. सूर्यास्ताच्या वेळेस यहोशुआने त्यांना हुकूम केला की, त्याचे शरीर झाडावरून काढा आणि ते खाली नगरवेशीच्या प्रवेशमार्गात फेकून द्यावे. नंतर त्यांनी त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास रचून ठेवली, ती आजपर्यंत राहिली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:29
14 Iomraidhean Croise  

तेव्हा लोकांनी अबशालोमाला खाली काढून वनातल्या मोठ्या खड्ड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली; मग सर्व इस्राएल लोक पळून आपापल्या डेर्‍यांकडे गेले.


तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.


तेव्हा तो अधिपतींवर अपमानाचा मारा करतो; त्यांना मार्गहीन वैराण प्रदेशात भटकण्यास लावतो.


तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील;


तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत (कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता), म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली.


त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.


परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा ह्यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्या नगरातल्या सर्व प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.


तेव्हा गेजेराचा राजा होराम लाखीशाला कुमक देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्याचा व त्याच्या लोकांचा एवढा संहार केला की त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.


यरीहोचा राजा, बेथेलाच्या बाजूस जे आय त्याचा राजा,


त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. ह्यावरून त्या स्थळाला आजवर आखोर (त्रास देणारी) खिंड म्हणत आले आहेत.


आय नगराच्या राजाला त्यांनी जिवंत धरून यहोशवाकडे आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan