Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला; आजपर्यंत तो तसाच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याची कायमची नासाडी करून त्याचा ढीग केला; आजपर्यंत ते ठिकाण भकास आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 अशा रीतीने यहोशुआने आय शहर जाळून टाकले आणि ते नाश झालेल्या अवशेषांचा ढिगारा असे केले, आजपर्यंत ते ठिकाण असेच ओसाड पडलेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:28
11 Iomraidhean Croise  

तुझ्या कानावर हे आले नाही काय की मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले की तटबंदी नगरांचा विध्वंस करून त्यांचे ढीग करण्यात यावेत?


दिमिष्काविषयीची देववाणी : पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे.


तू शहराला मोडतोडीचा ढीग बनवले आहेस; तटबंदीचा गाव धुळीस मिळवला आहेस; विदेशीयांच्या महालांनी भरलेले शहर नष्ट केले आहेस; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत अम्मोन्यांचा राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकायला लावीन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांना अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.


तुम्ही सर्व चोहोकडून त्याच्यावर चढाई करा; त्याची भांडारे उघडा; त्याचे ढीग करा; त्याचा विध्वंस करा; त्याचे काही शिल्लक राहू देऊ नका.


यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


तू त्या नगरातील सर्व लूट चवाठ्यावर जमा करावीस, आणि ते नगर त्यातल्या लुटीसह आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सर्वस्वी जाळून नष्ट करावेस; त्याचा ढिगार कायमचा तसाच पडू द्यावास; ते पुन्हा वसवू नयेस.


अशा शापित वस्तूंतले काहीएक तुझ्या हाताला लागून राहू नये; म्हणजे परमेश्वर आपल्या तीव्र कोपापासून परावृत्त होऊन तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तुझ्यावर दया करील व तुझा कळवळा येऊन तो तुला बहुगुणित करील.


तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा धोंडे उभे केले; ते आजपर्यंत तेथे आहेत.


आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिले व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून उतरवून नगराच्या वेशीजवळ टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली; ती आजपर्यंत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan