यहोशवा 8:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ज्या मोकळ्या रानात इस्राएलांनी आयकरांचा पाठलाग केला होता तेथे त्यांनी त्या सर्वांची कत्तल केली आणि त्यांचा तलवारीने साफ फडशा उडवला; त्यानंतर सर्व इस्राएल आय नगरात परत आले व त्यावरही त्यांनी तलवार चालवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ज्या मोकळ्या रानात त्यांनी त्यांचा पाठलाग केला होता तेथे इस्राएलांनी आय नगराच्या रहिवाश्यांचा संहार केला आणि त्यांनी त्या सर्वांचा तलवारीच्या धारेने नाश केला. मग इस्राएल लोक आय नगरात परत आले. त्यावर त्यांनी तलवारीच्या धारेने हल्ला केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आय नगरात राहणारे जे मैदानात आणि रानात त्यांचा पाठलाग करीत आले होते त्यांच्यातील प्रत्येकाला इस्राएलने तलवारीने मारून संपविल्यानंतर सर्व इस्राएली लोक आय शहराकडे परत आले आणि तिथे असलेल्या सर्व लोकांना त्यांनी मारून टाकले. Faic an caibideil |