Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्यांच्याशी सामना करायला ती दुसरी टोळीही नगरातून निघाली; असे ते दोहो बाजूंनी इस्राएलाच्या कचाट्यात सापडले; इस्राएलाने त्यांचा संहार केला; त्यांच्यातला कोणी जिवंत राहिला नाही किंवा निसटून गेला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आणि दुसरे इस्राएल सैन्य जे नगरात होते ते त्यांच्यावर चाल करून बाहेर आले. आय नगराची माणसे इस्राएलाच्या मध्ये सापडली; कित्येक इस्राएल इकडे व कित्येक तिकडे होते; आणि त्यांनी त्यांना असे मारले की त्यांच्यातला कोणी वाचला किंवा निसटून गेला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 दबा धरून बसलेले सैन्यसुद्धा शहरातून बाहेर पडून त्यांच्या विरोधात आले तेव्हा ते दोन्ही बाजूंनी इस्राएली लोकांमध्ये सापडले. इस्राएली लोकांनी त्या सर्वांना मारून टाकले, त्यातील कोणीही जिवंत ठेवला नाही किंवा निसटूनही गेला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:22
10 Iomraidhean Croise  

की दुर्जनांचा जयजयकार अल्पकालिक असतो; अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.


आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस.


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्याचा व त्याच्या राजाचा संहार केला; त्यांच्याबरोबरच तेथल्या सगळ्या प्राण्यांचाही त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही; त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.


त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरेमेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला.


दबा धरणार्‍यांनी नगर हस्तगत केल्याचे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्राएलाने पाहिले तेव्हा ते मागे उलटून आयकरांवर तुटून पडले.


आय नगराच्या राजाला त्यांनी जिवंत धरून यहोशवाकडे आणले.


तुम्ही ते नगर हस्तगत केल्यावर त्याला आग लावा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करा; मी तुम्हांला आज्ञा केली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan