Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तो नगराचा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे पळण्याची ताकद राहिली नाही; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणार्‍यांवर उलटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पहिले तो नगरातून निघणारा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे निसटून जाण्याचा मार्गच राहिला नाही; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणाऱ्यांवर उलटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आयच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की त्यांच्या शहरातून धूर निघून वर आकाशात जात आहे, परंतु आता कोणत्याही दिशेकडे पळून जाणे त्यांना शक्य नव्हते; जे इस्राएली लोक रानाकडे पळत चालले होते ते आता मागे वळून त्यांचा पाठलाग करणार्‍यांवर चालून आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:20
14 Iomraidhean Croise  

त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश ह्यांच्याकडे नजर फेकली तर पाहा, त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता!


दुष्टांचे डोळे थकतील; त्यांना कोणतेही शरणस्थान राहणार नाही; प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल.”


कणखर मनाच्या पुरुषांची लूटमार झाली आहे; ते झोपी गेले आहेत; त्यांतील कोणाही बलवानाचे हात चालेनात.


तो रात्रंदिवस विझणार नाही; त्याचा धूर सदा चढत राहील; पिढ्यानपिढ्या तो ओसाड पडेल; त्यात कोणी कधीही संचार करणार नाही.


त्याने आपला हात उगारताच दबा धरणार्‍यांनी लगबगीने उठून धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले आणि लगेच नगराला आग लावली.


दबा धरणार्‍यांनी नगर हस्तगत केल्याचे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्राएलाने पाहिले तेव्हा ते मागे उलटून आयकरांवर तुटून पडले.


‘पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता ‘रडतील व ऊर बडवून घेतील.’


ते दुसर्‍यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.”


इस्राएल लोक आणि दबा धरणारे ह्यांच्यामध्ये असा संकेत ठरला होता की, दबा धरणार्‍यांनी नगरात धूर करून त्याचा लोट वर चढेल असे करावे.


इकडे नगरातून धुराचा लोट वर चढू लागला. बन्यामिनी मागे वळून पाहतात तर सगळ्या नगरात धूरच धूर होऊन आकाशाकडे त्याचा लोट चालला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले.


इस्राएल लोक उलटले तेव्हा बन्यामिन्यांची गाळण उडाली. आपल्यावर संकट येऊन ठेपले आहे असे त्यांच्या लक्षात येऊन चुकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan