Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील उताराकडे गेले, पण नगराच्या पिछाडीस लोक आपणांवर दबा धरून आहेत हे त्यांच्या गावीही नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील यार्देनेच्या दरीकडे गेले. पण नगराच्या पिछाडीस लोक आपणावर दबा धरून आहेत हे त्यांना माहीत नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा आय शहराच्या राजाने हे पाहिले, तेव्हा तो आणि त्या शहराचे सर्व पुरुष पहाटेस घाई करून अराबासमोर एका विशिष्ट ठिकाणी इस्राएलशी युद्ध करण्यास निघाले. परंतु त्याला माहीत नव्हते की शहराच्या मागील बाजूस शत्रुसैन्य दबा धरून बसले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:14
15 Iomraidhean Croise  

कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.


सोअनाचे सरदार, फारोचे शहाणे मंत्री निवळ मूर्ख बनले आहेत; त्यांची मसलत पशूच्या समान झाली आहे; “मी शहाण्यांचा पुत्र आहे, मी प्राचीन राजांचा वंशज आहे” असे तुम्ही फारोला कसे म्हणता?


सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत; नोफाचे सरदार फसले आहेत; मिसरी गोत्रांची कोनशिला असे जे, त्यांनी मिसराला बहकवले आहे.


हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, “हे राजा, नबुखद्नेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे.


आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल.


तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन


यार्देनेच्या पूर्वेस रानातील अराबात सूफासमोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब ह्यांच्या दरम्यान जी वचने मोशे सर्व इस्राएलांशी बोलला ती ही.


ह्याप्रमाणे नगराच्या उत्तरेस कोणते सैन्य जायचे आणि पश्‍चिमेस कोणी दबा धरायचा हे ठरवून यहोशवा त्या रात्री खोर्‍यात राहिला.


मग यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर मोड झाल्याचे सोंग करून रानाच्या वाटेने पळू लागले.


त्यांचा पाठलाग करण्यासाठी नगरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलावण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करत नगरापासून दूरवर गेले.


मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ, आणि ते पूर्वीप्रमाणे आमच्यावर हल्ला करायला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासमोरून पळू लागू.


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


दबा धरणार्‍यांनी त्वरा करून गिब्यावर छापा घातला आणि पुढे सरसावून सर्व नगराचा तलवारीने नाश केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan