Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील; तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरच्या लोकांस आमचे नाव विसरावयास लावतील. तेव्हा तू आपल्या महान नावासाठी काय करणार आहेस?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 कारण कनानी लोक आणि आसपासची राष्ट्रे याबद्दल ऐकतील, तेव्हा ते आम्हाला सभोवार घेरतील, आमच्यावर हल्ला करतील आणि आम्हाला नामशेष करून टाकतील. मग तुमच्या महान नावाच्या थोरवीचे काय होईल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 7:9
19 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस.


हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे; तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे;


हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठी आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठी आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक.


ते म्हणतात, “चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत; म्हणजे इस्राएलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.”


कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे, ते तुझ्याविरुद्ध कट करतात;


त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो.


तथापि माझ्या नामासाठी, ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा, म्हणून मी हे कार्य केले; मी त्यांना मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्यादेखत त्यांना प्रकट झालो.


देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’


जी मला म्हणाली होती की, “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल; माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यांतल्या चिखलासारखे तुडवतील.


मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस.


हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, “मी ते गौरवले आहे आणि पुन्हाही गौरवीन.”


देशील तर ज्या देशातून तू आम्हांला काढून आणलेस, तेथले लोक म्हणतील की, जो देश त्यांना देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते तेथे त्यांना त्याला नेता आले नाही आणि तो त्यांचा द्वेष करीत होता म्हणून तो त्यांना रानात मारून टाकण्यासाठी घेऊन गेला.


तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “ऊठ, असा पालथा का पडलास?


हे प्रभो, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली; आता मी काय बोलू?


परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan