Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा यहोशवाने आपले कपडे फाडले, आणि तो व इस्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्राएलाचे वडील संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा यहोशुआने त्याची वस्त्रे फाडली आणि तो संध्याकाळपर्यंत याहवेहच्या कोशासमोर जमिनीवर तसाच पालथा पडून राहिला. इस्राएलच्या वडीलजनांनी तसेच केले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर राख शिंपडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 7:6
30 Iomraidhean Croise  

रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली.


तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.


हे ऐकून दाविदाने आपली वस्त्रे धरून फाडली आणि जितके लोक त्याच्याबरोबर होते त्यांनीही तसेच केले.


शौल, त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्राएलाचे घराणे हे सर्व तलवारीने पडले म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले.


ह्यानंतर तिसर्‍या दिवशी छावणीतून शौल होता तेथून एक माणूस आला; त्याने आपले कपडे फाडले होते व डोक्यात धूळ घातली होती. तो दाविदाजवळ येऊन पोहचल्यावर त्याने त्याला साष्टांग दंडवत घातले.


म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकळूत करू लागला. त्याने उपास केला व आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.


तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली.


हे ऐकून दाविदाने उठून आपली वस्त्रे फाडली व जमिनीवर अंग टाकले; त्याचे सर्व सेवकही आपली वस्त्रे फाडून त्याच्याजवळ उभे राहिले.


त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली.


त्या नियमशास्त्रातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली.


एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करत असता इस्राएल स्त्रीपुरुष व मुलेबाळे ह्यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला; लोक धायधाय रडत होते.


ह्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इस्राएल लोक उपास करून गोणपाट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकत्र झाले.


हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणपाट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले;


राजाचा हुकूम व फर्मान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहचले तेथे तेथे यहूदी लोकांत मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली; बहुतेक लोक गोणपाट नेसून राखेत पडून राहिले.


मग ईयोबाने उठून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले.


त्यांनी ईयोबाला दुरून न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्यांना ओळखता येईना; मग ते मोठ्याने रडले; प्रत्येकाने आपला झगा फाडला आणि आकाशाकडे धूळ उडवून त्यांनी ती आपल्या डोक्यांत घातली.


म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे.”


सीयोनकन्येचे वडील जन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत; त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आहे; त्यांनी गोणपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत; यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववत आहेत.


आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब ह्यांनी आपले कपडे फाडले;


तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”


“तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करतो.” हे ऐकून ते पालथे पडले.


हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले,


यहोशवा म्हणाला, “हायहाय! हे प्रभू परमेश्वरा, आम्हांला अमोर्‍यांच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देनेपार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देनेपलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते!


‘त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करत व आक्रोश करत’ म्हटले, अरेरे, ‘जिच्या’ धनसंपत्तीने ‘समुद्रातील गलबतांचे सगळे’ मालक ‘श्रीमंत झाले’ ती मोठी नगरी! तिची एका घटकेत ‘राखरांगोळी झाली!’


तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, “हाय! हाय! मुली, तू माझे मन खचवले आहेस; तू माझ्यावर मोठे संकट आणले आहेस; परमेश्वराला मी शब्द दिला आहे; आता मला माघार घेता येत नाही.”


इस्राएल लोक जाऊन संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर रडले; आणि “आपला बंधू बन्यामीन ह्याच्या लोकांशी लढायला पुन्हा जावे काय?” असे परमेश्वराला त्यांनी विचारले. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “त्यांच्यावर चाल करून जा.”


मग सर्व इस्राएल लोक मिळून बेथेल येथे जाऊन परमेश्वरापुढे रडत बसले; त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे केली.


ते बेथेल येथे गेले आणि संध्याकाळपर्यंत देवासमोर बसून त्यांनी मोठ्याने रडून आकांत केला.


त्याच दिवशी एक बन्यामिनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला; त्याने आपली वस्त्रे फाडली होती व डोक्यात धूळ घातली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan