Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारत नेले; त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणीपाणी झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आय येथील मनुष्यांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले; आणि त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांचे धैर्य खचले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आयच्या लोकांनी त्यांच्यातील छत्तीसजणांना मारून टाकले. त्यांनी इस्राएली सैनिकांचा वेशीपुढे शबारीमपर्यंत पाठलाग केला; यामुळे लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून पाण्यासारखी झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 7:5
10 Iomraidhean Croise  

मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे.


वाहणार्‍या लोंढ्याप्रमाणे ते वाहून जावोत; तो बाण रोखील तेव्हा ते भंग पावल्याप्रमाणे होवोत.


ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे;


आणि ‘उसासा का टाकतोस?’ असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यांना सांग की, ‘ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून; तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल; पाहा, ती प्रत्ययास येत आहे, तिच्याप्रमाणे खास घडेल,”’ असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की, उडणार्‍या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील; तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील.


ती रिकामी, शून्य व ओसाड झाली आहे; तिच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे, तिचे गुडघे लटपटत आहेत, सर्वांच्या कंबरेत कळा निघत आहेत, त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत.


तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अमोर्‍यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाश्यांप्रमाणे तुमचा पाठलाग केला, आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हांला पिटाळून लावले.


हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.


आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे;


इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देनेपलीकडील अमोर्‍यांच्या सर्व राजांनी व समुद्र-किनार्‍याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan