यहोशवा 7:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. ह्यावरून त्या स्थळाला आजवर आखोर (त्रास देणारी) खिंड म्हणत आले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली; ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला राग शांत झाला. यावरुन त्या स्थळाला आजपर्यंत अखोरचे खोरे असे म्हणतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आणि आखानावर दगडांची एक मोठी रास केली, जी आज देखील तिथे आहे. तेव्हा याहवेहचा कोप शांत झाला आणि तेव्हापासून त्या ठिकाणाला अखोरचे खोरे असे म्हटले जाते. Faic an caibideil |
सर्व मंडळीच्या तर्फे आमचे सरदार नेमावेत आणि आमच्या देवाचा भडकलेला तीव्र कोप आमच्यावरून दूर होईपर्यंत आणि ह्या प्रकरणाचे निराकरण होईपर्यंत आमच्या नगरांतल्या ज्या रहिवाशांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या आहेत त्यांनी नेमलेल्या वेळी यावे, आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक नगराचे वडील जन व न्यायाधीश ह्यांनीही यावे.”