Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 7:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्यास दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मग यहोशुआ आखानाला म्हणाला, “तू आमच्यावर अरिष्ट का आणलेस? आता याहवेह तुझ्यावर अरिष्ट आणतील.” मग इस्राएल लोकांनी त्याला धोंडमार केली व त्याच्या बरोबरच्या इतरांनाही धोंडमार केल्यावर त्यांनी त्यांना जाळून टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 7:25
23 Iomraidhean Croise  

तेव्हा शिमोन व लेवी ह्यांना याकोब म्हणाला, “ह्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी ह्यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला संकटात घातले आहे; माझे लोक मूठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील, आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील.”


ह्या गोष्टीला सुमारे तीन महिने झाले तेव्हा कोणी यहूदाला सांगितले की, “तुझी सून तामार हिने वेश्याकर्म केले व त्या जारकर्मामुळे तिला दिवस गेले आहेत.” तेव्हा यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढून जाळून टाका.”


कर्मीचा पुत्र आखान; ह्यानेच समर्पित वस्तूसंबंधाने आगळीक करून इस्राएलास क्लेश दिला.


धनाचा लोभ धरणार्‍या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.


धनलोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो, पण ज्याला लाचेचा तिटकारा असतो तो वाचतो.


एखादी स्त्री व तिची आई ह्या दोघींना कोणा पुरुषाने ठेवले1 तर तो अतिदुष्टपणा होय; तो पुरुष व त्या दोघी स्त्रिया ह्यांना अग्नीत जाळून टाकावे. तुमच्यामध्ये अतिदुष्टपणा नसावा.


“इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, इस्राएल लोकांपैकी अथवा इस्राएल लोकांमध्ये राहणार्‍या परदेशीयांपैकी कोणी आपले अपत्य मोलखास अर्पण केले तर त्याला अवश्य जिवे मारावे; आपल्या देशाच्या लोकांनी त्याला दगडमार करावा.


एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करून भ्रष्ट झाली तर तिने आपल्या बापालाही भ्रष्ट केले असे होईल; तिला अग्नीत जाळून टाकावे.


“तुम्ही त्या शिव्याशाप देणार्‍याला छावणीबाहेर घेऊन जा आणि जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत; नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा.


तुमच्या ठायी अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल.


मरेपर्यंत त्याला दगडमार करावा; कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून म्हणजे दास्यगृहातून काढून आणले त्याच्यापासून तुला बहकवण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.


हे ऐकून सर्व इस्राएल लोकांना भीती वाटेल आणि तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते पुन्हा करणार नाहीत.


तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर.


मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्राएल लोक हे ऐकून भितील.


तुमच्यावर संकट आणणार्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्‍या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,


देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ” अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी ‘आपले ज्येष्ठपण विकले’ त्या ‘एसावासारखे’ कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या.


तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यांतली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल.


ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूर्खपणा केला आहे.”


योनाथान म्हणाला, “माझ्या बापाने देश कष्टी करून सोडला आहे; मी हा मध थोडासा चाखला तोच माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत पाहा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan