यहोशवा 7:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्यानंतर यहोशवाने व त्याच्याबरोबरच्या सर्व इस्राएल लोकांनी आखान बिन जेरह ह्याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याचे मुलगे व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडेमेंढरे, त्याचा डेरा व त्याचे जे काही होतेनव्हते ते सर्व आखोर खिंडीत नेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्यानंतर यहोशवाने व त्यासोबतच्या सर्व इस्राएल लोकांनी जेरहाचा पुत्र आखान याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याची मुले व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडेमेंढरांचे कळप, त्याचा तंबू व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी जेरहाचा पुत्र आखान व त्याच्याबरोबर, ती चांदी, तो झगा, ती सोन्याची लगड, त्याचे पुत्र, त्याच्या कन्या, त्याचे बैल, गाढवे, मेंढरे, त्याचा तंबू आणि त्याचे जे काही होते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले. Faic an caibideil |