Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूर्खपणा केला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्यास त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून त्याचा नाश करावा. कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूढपणाचे काम केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जो कोणी समर्पित केलेल्या वस्तूसह सापडेल त्याला, त्याच्याकडे असलेल्या सर्व वस्तूसह जाळून टाकावे. त्याने याहवेहचा करार मोडला आहे आणि इस्राएलमध्ये घृणास्पद कृत्य केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 7:15
11 Iomraidhean Croise  

ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले; शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्राएलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना मनस्वी दु:ख होऊन ते फार संतापले.


माझी बेअब्रू झाल्यास ती मी कोठे लपवू? व तुझी तर इस्राएलातल्या मूर्खांत गणना होईल; ह्यास्तव राजाशी बोलणे कर, म्हणजे तो मला तुला देण्याचे नाही म्हणणार नाही.”


इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.


यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्राएलाचा एकेक वंश समोर आणला, तेव्हा यहूदा वंश पकडला गेला;


मग सर्व इस्राएल वंशातील शंभर पुरुषांमागे दहा, हजारामागे शंभर, आणि दहा हजारांमागे एक हजार असे पुरुष निवडू; ते सैन्यासाठी भोजनसामग्री आणतील व आपण बन्यामिनाचे गिबा येथे जाऊन तेथील लोकांनी इस्राएलामध्ये जे निर्लज्ज कृत्य केले आहे त्याबद्दल त्यांचे पारिपत्य करू.”


आणि गिब्यातल्या लोकांनी रात्री घराला गराडा घातला; माझा खून करण्याचा त्यांचा बेत होता, आणि त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला व ती मेली.


तेव्हा मी माझ्या उपपत्नीला घरी आणून तिचे तुकडे केले आणि इस्राएलाच्या वतनांतील सर्व प्रांतात पाठवून दिले; कारण त्या लोकांनी इस्राएलामध्ये कामांध व निर्लज्ज कृत्य केले होते.


तेव्हा शौल म्हणाला, “मी अपराधी आहे; माझ्या पुत्रा दाविदा, माघारी ये; आज माझा प्राण तुझ्या दृष्टीला मोलवान वाटला म्हणून ह्यापुढे मी तुला काहीएक उपद्रव करणार नाही; मी मूर्खपणाने वागलो आहे, माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan