Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 म्हणून इस्राएल लोकांना आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही; ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्याचा परिणाम म्हणून इस्राएल लोक आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरत नाहीत, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नाश केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्यामध्ये राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 यामुळे इस्राएल त्यांच्या शत्रूपुढे उभे राहू शकत नाहीत; ते पाठ फिरवून पळून जात आहेत, कारण त्यांच्या नाशासाठी तेच जबाबदार आहेत. तुमच्यामधून नाशासाठी समर्पित असलेल्या वस्तूंचा तुम्ही नाश करेपर्यंत मी तुम्हाबरोबर असणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 7:12
21 Iomraidhean Croise  

तू आम्हांला शत्रूला पाठ दाखवायला लावलेस, आमचा द्वेष करणारे आम्हांला यथेच्छ लुटतात.


हे देवा, तू आमचा त्याग केलास ना? हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस.


कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.


तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत; तुमच्या पातकांमुळे तो तुम्हांला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही.


जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारील की, ‘परमेश्वराचे भारी वचन काय आहे?’ तेव्हा त्यांना म्हण, ‘तुम्ही भारी आहात आणि मीच तुम्हांला टाकून देईन,’ असे परमेश्वर म्हणतो.


यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाहीतर तुझ्यावरचा माझा जीव उडेल, मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन.”


त्यांनी मुले लहानाची मोठी केली, तरी एकही मनुष्य उरणार नाही असे मी त्यांना अपत्यहीन करीन; मी त्यांच्यापासून निघून जाईन तेव्हा त्यांना धिक्कार असो!


तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तू ह्या बेइमानी करणार्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्याला दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस?


मोशेने हे शब्द इस्राएल लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी फार विलाप केला.


चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही; कराल तर शत्रूंकडून तुमचा संहार होईल.


पाहा, तुमच्यापुढे अमालेकी व कनानी लोक आहेत म्हणून तुम्ही तलवारीने पडाल; तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहात म्हणून परमेश्वर तुमच्याबरोबर असणार नाही.”


तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लावले.


कोणतीही अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नकोस, आणशील तर तूही तिच्याप्रमाणे नाशास पात्र ठरशील; तिचा अगदी वीट मान व तिचा पूर्णपणे अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.


तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यांतली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल.


ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे, ह्याची त्याला कल्पना नव्हती.


म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.


परमेश्वराचा दूत सगळ्या इस्राएल लोकांना हे म्हणाला तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला.


शौल म्हणाला, “लोकनायकहो, इकडे या; आज कोणत्या प्रकारे हे पातक झाले आहे ह्याचा शोध करून पाहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan