Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मेंढ्याच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन सात याजक कोशाच्या पुढे ठेवा. सातव्या दिवशी याजक रणशिंगे वाजवित शहराभोवती सात वेळेस प्रदक्षिणा घालतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 6:4
33 Iomraidhean Croise  

देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला.


त्याने आपल्या चाकराला सांगितले, “वर चढ; समुद्राकडे दृष्टी लाव.” त्याने जाऊन तसे केले आणि म्हटले, “काही दिसत नाही.” एलिया म्हणाला, “आणखी सात वेळा जा.”


अलीशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की, “जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.”


मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारल्या; तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.


पाहा, आमच्याबरोबर, आमच्यापुढे देव आहे; तुमच्याविरुद्ध लोकांना इशारा देण्यासाठी त्याचे याजक कर्णे हाती घेऊन असतात. इस्राएल लोकहो, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याशी लढू नका; तुम्हांला यश यायचे नाही.”


ह्या लढाईत तुम्हांला लढावे लागणार नाही; हे यहूदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.’ घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.”


आणि कहाथी व कोरही ह्यांच्यातले काही लेवी उभे राहून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे स्तवन उच्च स्वराने करू लागले.


सैन्याबरोबर बाहेर जाताना ‘परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे,’ हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमले.


तर आता तुम्ही सात बैल व सात एडके घेऊन माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा; मग माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करील; कारण मी त्याच्यावरच अनुग्रह करीन; म्हणजे मग माझा सेवक ईयोब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, ह्या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हांला मिळणार नाही.”


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले थोडे परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे.


याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर, पवित्रस्थानाच्या अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.


त्याने मला विचारले, “तुझ्या दृष्टीस काय पडते?” मी म्हणालो, “माझ्या दृष्टीस असे पडते की, एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे, त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला सात दिवे आहेत व त्याच्यावरील सात दिव्यांना सात नळ्या आहेत.


तेव्हा त्याने मला उत्तर केले, “जरूब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


मग बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”


सात याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते.


तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा.


रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.”


जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे, आणि सोन्याच्या त्या सात समयांचे ‘गूज’ हे आहे; ते सात तारे हे सात मंडळ्यांचे दूत आहेत; आणि सात समया ज्या तू पाहिल्या त्या सात मंडळ्या आहेत.


आशियातील सात मंडळ्यांना योहानाकडून : जो आहे, जो होता व जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्यापासून,


आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले.


नंतर मी अत्यंत आश्‍चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले; ‘सात पीडा’ घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले; त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.


त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणार्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांना दिल्या.


नंतर मी ‘मंदिरातून निघालेली एक’ मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा, देवाच्या ‘क्रोधाच्या’ सात वाट्या ‘पृथ्वीवर ओता.”’


‘जो राजासनावर बसलेला होता’ त्याच्या उजव्या हातात ‘पाठपोट लिहिलेली’ व सात शिक्के ‘मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी’ मी पाहिली;


तेव्हा राजासन व चार प्राणी ह्यांच्यामध्ये व वडीलमंडळ ह्यांच्यामध्ये, ज्याचा जणू काय ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ उभा राहिलेला मी पाहिला; त्याला सात शिंगे व ‘सात डोळे होते;’ ते ‘सर्व पृथ्वीवर’ पाठवलेले देवाचे सात आत्मे आहेत.


तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांना सात कर्णे देण्यात आले.


मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजवण्यास सिद्ध झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan