Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 6:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 ह्याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 याप्रमाणे याहवेह यहोशुआबरोबर होते आणि त्याच्या नावाची सर्वत्र किर्ती पसरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 6:27
22 Iomraidhean Croise  

तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिकार्‍याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.


जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन.


दाविदाची कीर्ती देशोदेशी पसरली; परमेश्वराने सर्व राष्ट्रांवर त्याचा धाक बसवला.


मर्दखयाचा राजदरबारी मोठा मान असून त्याची कीर्ती सर्व प्रांतांतून पसरली होती; मर्दखयाचा महिमा उत्तरोत्तर वाढत गेला.


त्या वेळी मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली,


कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


आणि त्याची कीर्ती सूरिया देशभर पसरली; तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले.


प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.


खंबीर हो, हिंमत धर, त्यांना भिऊ नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही.”


तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.


प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुमच्याबरोबर कृपा असो.


तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेन; मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.


मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”


हे ऐकून यार्देनेच्या पश्‍चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनार्‍यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांचे सर्व राजे


यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले,


त्यांनी त्याला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे;


यहूदाबरोबर परमेश्वर होता; त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला; पण तळवटीत राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना हाकून देणे त्याला जमेना.


दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे.


ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan