Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 6:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 सर्व चांदी आणि सोने, तसेच मिश्र धातूची वेगवेगळी पात्रे आणि लोखंडाची पात्रे याहवेहला समर्पित आहेत आणि ती त्यांच्या भांडारात आणली पाहिजे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 6:19
25 Iomraidhean Croise  

सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदीसोन्याबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला अर्पण केली;


त्याने परमेश्वराच्या मंदिरांतील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले; शलमोन राजाने ज्या सोन्याच्या ढाली केल्या होत्या त्याही त्याने नेल्या.


ह्या प्रकारे परमेश्वराच्या मंदिराचे जे जे काम शलमोन राजाने हाती घेतले ते समाप्त झाले. नंतर आपला बाप दावीद ह्याने समर्पित केलेले सोने, चांदी आणि पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.


मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले; शलमोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्यांचे त्याने तुकडे केले; तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते.


सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून आणलेल्या सोन्याचांदीबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला समर्पण केली. अदोमी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी व अमालेकी ह्या सर्वांपासून ही लूट आणली होती.


लेव्यांपैकी अहिया हा देवमंदिराच्या भांडारांवर व देवाला वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारावर होता.


दावीद राजा, पितृकुळांचे मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती, व मुख्य सेनापती ह्यांनी देवाला वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारांवर शलोमोथ व त्याचे भाऊबंद ह्यांना नेमले होते.


लढाईत जी लूट त्यांना मिळत असे तिच्यापैकी काही परमेश्वराचे मंदिर दुरुस्त करण्यासाठी ते समर्पण करीत.


शमुवेल द्रष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर, आणि सरूवेचा पुत्र यवाब ह्यांनी ज्या वस्तू समर्पित केल्या होत्या त्या व इतरांनी ज्या समर्पित केल्या होत्या त्या सर्व शलोमोथ व त्याचे बांधव ह्यांच्या हवाली केल्या होत्या.


त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चोहोबाजूंच्या कोठड्या, देवमंदिराची भांडारे व समर्पित केलेल्या वस्तूंची भांडारे ह्यांचे जे नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्याला मिळाले होते ते सर्व त्याने त्याला दिले.


त्याच्या बापाने व त्याने स्वत: सोने, चांदी व पात्रे परमेश्वराला वाहिली होती ती सर्व त्याने देवाच्या मंदिरात नेऊन ठेवली.


लोक अर्पणे, दशमांश व वाहिलेल्या वस्तू प्रामाणिकपणे आणून पोचवू लागले; त्यांचा मुख्य अधिकारी कोनन्या नावाचा एक लेवी असून त्याचा दुय्यम त्याचा भाऊ शिमी हा होता.


लेवी दशमांश घेतील तेव्हा त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातला कोणी याजक असावा, आणि लेव्यांनी दशमांशाचा दशमांश आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठड्यांत म्हणजे भांडारात पोचता करावा.


एबद-मलेख बरोबर माणसे घेऊन खजिन्याच्या राजगृहात गेला; तेथून त्याने जुनीपुराणी फडकी व कुजट चिंध्या घेतल्या, आणि दोरांनी त्या विहिरीत यिर्मयाकडे पोहचवल्या.


पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराच्या उपकारस्मरणार्थ पवित्र समजावीत.


सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.


मग सारी लूट, सर्व पाडाव केलेली माणसे आणि जनावरे त्यांनी बरोबर घेतली.


आणि यरीहोजवळ यार्देनेतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, एलाजार याजक आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांनी ते बंदिवान, धरलेली जनावरे व लूट आणली.


सोने, चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिसे वगैरे


मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे.”


मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते.


इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan