Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 6:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यांतली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वदा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल, तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणाल व तिला संकटात पाडाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु अर्पण केलेल्या सर्व वस्तूंपासून दूर राहा, म्हणजे त्यातील काहीही घेतल्याने तुम्ही स्वतःवर नाश ओढवून घेणार नाही. नाहीतर तुम्ही इस्राएलच्या छावणीच्या नाशासाठी जबाबदार ठराल आणि तिच्यावर संकट आणाल. प्रत्येक वस्तूचा तुम्ही नाश केला नाही, तर संपूर्ण इस्राएली राष्ट्रावर अनर्थ कोसळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 6:18
20 Iomraidhean Croise  

दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला; तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्‍न केला. परमेश्वराने उत्तर दिले, “शौल व त्याचे खुनी घराणे ह्यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला.”


युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे; एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो.


तो त्यांना म्हणाला, “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.”


प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा;


म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’


अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा;


अशा शापित वस्तूंतले काहीएक तुझ्या हाताला लागून राहू नये; म्हणजे परमेश्वर आपल्या तीव्र कोपापासून परावृत्त होऊन तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तुझ्यावर दया करील व तुझा कळवळा येऊन तो तुला बहुगुणित करील.


जर कोणा पुरुषाला रात्री काही अशुद्धता आपोआप प्राप्त झाली तर त्याने छावणीबाहेर जावे, त्याने छावणीच्या आत येऊ नये;


कोणतीही अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नकोस, आणशील तर तूही तिच्याप्रमाणे नाशास पात्र ठरशील; तिचा अगदी वीट मान व तिचा पूर्णपणे अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला; यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला.


तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग : उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ‘हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.’


ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूर्खपणा केला आहे.”


यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.


मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तींपासून दूर राखा.


तरीपण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखले; त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशू, कोकरे आणि जेजे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले; त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan