Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 6:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे, मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वरास समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्यासोबत तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 हे शहर आणि त्यातील सर्वकाही याहवेहला समर्पित करावे. राहाब वेश्या आणि जी कोणी माणसे तिच्या घरात असतील त्यांना वाचविले जावे, कारण आपण पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 6:17
26 Iomraidhean Croise  

तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”


सरदार व वडील जन ह्यांचा सल्ला जो कोणी ऐकणार नाही व तीन दिवसांच्या आत येणार नाही त्याची सर्व मालमत्ता जप्त होईल आणि बंदिवासातून आलेल्या मंडळीतून त्याला निराळे काढण्यात येईल.


परमेश्वराची तलवार रक्ताने भरली आहे. मांद्याने, कोकरांच्या व बकर्‍यांच्या रक्ताने, एडक्यांच्या गुर्द्यांच्या मांद्याने पुष्ट झाली आहे; कारण परमेश्वर बसरा येथे यज्ञ, अदोमाच्या देशात महावध करणार आहे.


तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचा आहे, आपल्या शत्रूंवर सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने उत्तरेच्या देशात फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडला आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मानवपुत्रा, हरतर्‍हेच्या पक्ष्यांना व वनपशूंना सांग की जमा व्हा; या, मी तुमच्यासाठी यज्ञबली कापत आहे, इस्राएलाच्या पर्वतांवर महायज्ञ करत आहे; तेथे चोहोंकडून एकत्र होऊन मांस खा, रक्त प्या.


पण योबेलवर्षी ते शेत सुटेल तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे वतन होईल.


सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.


तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’


जर कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. माराना था.1


तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो; तुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवाकरता नेमले होते.


कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे.”


नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे; परंतु “जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्या योगे जगेल.”


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांचा समूळ नाश कर.


राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणार्‍यांबरोबर तिचा नाश झाला नाही.


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


तसेच राहाब वेश्या हिनेदेखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसर्‍या वाटेने लावून दिले; ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय?


नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.


ते जाऊन डोंगरवटीत पोहचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणार्‍यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत.


इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला; यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला.


तर आता जाऊन अमालेकास मार दे; त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस; पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर.”’


शौल केनी लोकांना म्हणाला, “तुम्ही अमालेक्यांमधून निघून जा, नाहीतर त्यांच्याबरोबर तुमचाही संहार व्हायचा; कारण इस्राएल लोक मिसरातून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहभावाने वर्तला.” ह्यावरून केनी अमालेक्यांतून निघून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan