Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे.” म्हणून आजही त्या जागेला गिलगाल (लोटून देणे) म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी आपल्याद्वारे दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुमच्यापासून इजिप्तचा कलंक दूर लोटून दिला आहे,” यास्तव त्या ठिकाणाला गिलगाल असे नाव देण्यात आले आणि आज देखील ते ठिकाण त्याच नावाने ओळखले जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 5:9
21 Iomraidhean Croise  

ते त्यांना म्हणाले, “बेसुनत माणसाला आमची बहीण देणे हे आमच्या हातून होणार नाही, आम्हांला बट्टा लागेल.


राजा मागे परतून यार्देनेपर्यंत आला आणि यहूदी यार्देन नदीच्या अलीकडे राजाला घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले.


बेथ-गिलगाल येथून आणि गेबा व अजमावेथ येथल्या शेतवाडीतून गायकांचे वंशज एकत्र झाले; त्यांनी यरुशलेमेच्या आसपास खेडी वसवली होती.


मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.


परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, सुंती, पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन;


त्यांनी मिसर देशात व्यभिचार केला; त्यांनी आपल्या तारुण्यात व्यभिचार केला; तेथे त्यांची स्तने मर्दण्यात आली; पुरुषांनी त्यांच्या कौमार्यावस्थेतील त्यांची स्तनाग्रे चुरली.


मिसर देशातील आपली शिंदळकी तिने सोडून दिली नाही; तेथल्या पुरुषांनी तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर गमन केले, त्यांनी तिची कौमार्यावस्थेतील स्तनाग्रे चुरली व तिच्याबरोबर मनसोक्त व्यभिचार केला.


हे इस्राएला, तू जरी जारकर्म केले आहेस तरी यहूदाने अशा पापात पडू नये; गिल्गालास येऊ नका, व बेथ-आवेनास जाऊ नका, परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका.”


“तुम्ही त्या शिव्याशाप देणार्‍याला छावणीबाहेर घेऊन जा आणि जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत; नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा.


परंतु बेथेलास शरण जाऊ नका, गिल्गालात प्रवेश करू नका. पलीकडे बैर-शेब्यास जाऊ नका; कारण गिल्गाल खातरीने बंदिवासात जाईल, व बेथेल शून्यवत होईल.”


माझ्या प्रजे, मवाबाचा राजा बालाक ह्याने काय मसलत केली, बौराचा पुत्र बलाम ह्याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिल्गाल ह्यांच्या दरम्यान काय झाले ह्याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील.” परमेश्वराला काय हवे?


“यवाबाने केलेली निंदा मी ऐकली आहे, अम्मोन-वंशजांनी केलेली निर्भर्त्सना मी ऐकली आहे, त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे आणि त्यांच्या सरहद्दीवर त्यांनी आपल्या मोठेपणाचा तोरा मिरवला आहे.”


तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.


पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे डेरे दिले.


सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले.


तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, “चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ; कदाचित परमेश्वर आपले कार्य करील; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास अडचण नाही.”


आसपास उभे असणार्‍या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्‍या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”


आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”


तो वर्षानुवर्ष बेथेल, गिलगाल व मिस्पा ह्या सर्व ठिकाणी फेरी करून इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan