Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 5:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे, ह्या काळात त्यांचा संहार झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की, जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करीत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास लायक अशा पुरुषांनी परमेश्वराची वाणी न ऐकल्यामुळे, त्या काळात त्यांचा नाश झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथ देऊन सांगितले होते की, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहतात असा जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला होता, तो देश मी तुमच्या नजरेस पडू देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 इस्राएली लोक चाळीस वर्षे संपेपर्यत रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष युद्ध करण्याच्या वयाचे होते, ते सर्वजण याकाळात मरण पावले होते, कारण त्यांनी याहवेहची आज्ञा पाळली नव्हती. याहवेहनी त्यांना शपथपूर्वक सांगितले होते की, जो देश इस्राएलला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजास दिलेले होते त्या “दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या” देशात, मी त्यांना प्रवेश करू देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 5:6
20 Iomraidhean Croise  

काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले; त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही.


मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, तुम्हांला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


“जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.


आणखी मी हात उचलून रानात अशी शपथ घेतली की दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत व जो सर्व देशांचा मुकुटमणी आहे असा देश मी त्यांना दिला होता, त्यात मी त्यांना आणणार नाही;


त्या दिवशी मी हात उचलून त्यांच्याबरोबर शपथ केली की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुमच्यासाठी पाहिलेल्या देशात आणीन; तो देश सर्व देशांचा मुकुटमणी होय.


त्या दिवशी असे होईल की, पर्वतावरून नवा द्राक्षारस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, व यहूदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील; परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल तो शिट्टीमाच्या खोर्‍यास पाणी पुरवील.


म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडायचा नाही; ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यांतले कोणीही तो देश पाहणार नाहीत.


मोशे व एलाजार याजक ह्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी इस्राएल लोकांची गणती केली ती इतकी भरली.


चाळिसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या प्रतिपदेस जे काही इस्राएल लोकांना सांगावे म्हणून परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती, त्याप्रमाणे त्याने हे सर्व त्यांना सांगितले.


आपण कादेश-बर्ण्या सोडून जेरेद नाल्यापलीकडे गेलो, त्याला अडतीस वर्षे लागली; ह्या अवधीत परमेश्वराने शपथ वाहिल्याप्रमाणे त्या सबंध पिढीतल्या योद्ध्यांचा छावणीत नाश झाला.


कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे; ह्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे; आज ही चाळीस वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे; तुला कशाचीही वाण पडली नाही.’


ही चाळीस वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत; आणि तुझे पाय सुजले नाहीत.


म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, ‘हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.’


खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील.


त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या व मिसर्‍यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले; मिसर देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिलात.


मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती;


त्यांच्या जागी त्यांची जी मुले त्याने वाढवली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ती बेसुनतच राहिली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan