Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देनेपलीकडील अमोर्‍यांच्या सर्व राजांनी व समुद्र-किनार्‍याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्‍यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 5:1
32 Iomraidhean Croise  

अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते.


मी तुला तुझ्या भावांच्यापेक्षा जमिनीचा एक वाटा अधिक देतो, तो मी माझ्या तलवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला.”


राजाने गिबोनी लोकांना बोलावून त्यांच्याशी बोलणे केले. (हे गिबोनी लोक इस्राएल लोकांपैकी नसून अवशिष्ट अमोर्‍यांपैकी होते; इस्राएल लोकांनी त्यांच्याशी शपथ वाहून करार केला होता; पण इस्राएल लोक व यहूदी लोक ह्यांच्या अभिमानास्तव शौलाने गिबोनी लोकांचा संहार करण्याचा प्रयत्न केला होता.)


त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्‍यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली.


ह्या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार माझ्याकडे येऊन म्हणू लागले, “इस्राएल लोक, याजक व लेवी हे देशोदेशींच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत; ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी व अमोरी ह्यांच्याप्रमाणेच अमंगळ कृत्ये करतात.


अमोर्‍यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला;


मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळायला लावतील.


द्वीपे पाहून भ्याली, पृथ्वीच्या सीमा हादरल्या, ती जवळ येऊन भिडली.


असे म्हण, प्रभू परमेश्वर यरुशलेमेस म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहेत; तुझा बाप अमोरी व तुझी आई हित्तीण होती.


आणि ‘उसासा का टाकतोस?’ असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यांना सांग की, ‘ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून; तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल; पाहा, ती प्रत्ययास येत आहे, तिच्याप्रमाणे खास घडेल,”’ असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.


मी तर त्यांच्यापुढून अमोरी लोकांचा संहार केला; त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते; मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासवले.


नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनार्‍यावर व यार्देनेच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे.”


पण ह्या नगरांच्या रहिवाशांना घालवून देणे मनश्शेच्या वंशजांना जमेना; त्या देशातच राहण्याचा कनान्यांनी हट्ट धरला.


तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हांला मिळेल. तेथले जंगल तोडा म्हणजे आसपासचा प्रदेश तुमचा होईल. कनानी लोकांजवळ लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हाकून द्याल.”


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्‍याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले, आणि सर्व इस्राएल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे निघून गेले.


ते म्हणतील, “अरेरे! ‘बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती!’ एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.”


यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला विचारले की, “कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कोणी स्वारी करावी?”


इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपली प्रजा इस्राएल हिच्याकरता अमोर्‍यांना घालवून दिले आणि आता तू त्यांच्या प्रदेशावर हक्क गाजवायला बघतोस काय?


पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी.


तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापती सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथे राहत असे.


सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीने ह्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या; तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले, तो पाषाणासारखा झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan