Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा धोंडे उभे केले; ते आजपर्यंत तेथे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा दगड उभे केले; आणि ते आजपर्यंत स्मारक म्हणून तेथे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 यहोशुआने यार्देन नदीच्या मध्यभागी असलेले बारा धोंडे जिथे कराराचा कोश वाहून नेणारे याजक उभे होते तिथे उभे केले आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 4:9
16 Iomraidhean Croise  

त्याने तिचे नाव शेबा (शपथ) असे ठेवले, तिच्यावरून त्या नगराचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. ते आजपर्यंत चालू आहे.


याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारकस्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला.


बैरोथकर गित्तइमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरे म्हणून राहिले आहेत.


‘तुझे इस्राएल असे नाव पडेल’ असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते, त्याच्या वंशसंख्येइतके बारा धोंडे एलीयाने घेतले;


त्यांचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके कोशातून बाहेर आलेली गाभार्‍यासमोर दिसत, पण बाहेरून दिसत नसत; तो कोश आजपर्यंत तेथेच आहे.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा; मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो.”


इस्राएलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत, त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत, मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.


ह्यामुळे त्या शेताला ‘रक्ताचे शेत’ असे आजपर्यंत म्हणतात.


मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले; आणि ही जी गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे.


आणि त्याने त्याला मवाब देशातील बेथ-पौरासमोरील एका खोर्‍यात पुरले; परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहीत नाही.


ह्या गोष्टी यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्रस्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली.


मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक लवकर लवकर पार उतरून गेले.


त्या मनुष्याने हित्ती लोकांच्या देशात जाऊन एक नगर वसवले व त्याचे नाव लूज ठेवले. त्या नगराचे नाव आजपर्यंत तेच आहे.


त्या दिवसापासून पुढे हीच वहिवाट पडली; त्याने असाच नियमविधी इस्राएलांस आजपर्यंत लावून दिला आहे.


मग शमुवेलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन ह्यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन-एजर हे नाव देऊन म्हटले की, “येथवर परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan