यहोशवा 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यहोशवाच्या ह्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे बारा धोंडे यार्देनेच्या मध्यभागातून उचलून आणून आपल्याबरोबर मुक्कामावर ठेवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यहोशवाच्या या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून बारा धोंडे उचलून इस्राएल लोकांच्या वंशसंख्येप्रमाणे रचले. त्यांनी ते घेऊन त्या रात्री जिथे मुक्काम केला तिथे नेऊन ठेवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा इस्राएली लोकांनी यहोशुआने सांगितल्याप्रमाणे केले. याहवेहने यहोशुआला आज्ञापिल्यानुसार प्रत्येक गोत्रामागे एक याप्रमाणे बारा धोंडे त्यांनी यार्देन नदीच्या मध्यभागातून उचलले व ज्या ठिकाणी त्यांनी छावणी दिली, त्या ठिकाणी ते धोंडे ठेवले. Faic an caibideil |