Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, आणि पुढे तुमची मुलेबाळे विचारतील की, ‘ह्या धोंड्यांचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, पुढच्या येणाऱ्या दिवसात जेव्हा तुमची मुले तुम्हाला विचारतील की, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ते आपल्यासाठी एक चिन्ह असेल, यासाठी की जेव्हा भावी काळात तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 4:6
19 Iomraidhean Croise  

हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.


मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.


हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा; पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.


पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे? तेव्हा त्याला सांग, ‘मिसर देशातून, दास्यगृहातून परमेश्वराने आम्हांला आपल्या भुजबलाने बाहेर आणले,


हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे; परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा; कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले;


“तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे; ह्यावरून हे कळावे की, तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.


जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो.


काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल; ह्यावरून परमेश्वराचे नाव होईल; ते सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही.”


आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यांना आपले शब्बाथही दिले; ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यांना पवित्र केले हे त्यांना समजावे.


माझे शब्बाथ पवित्र माना, म्हणजे ते तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होतील व तुम्हांला समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे.


पाप करून आपल्या जिवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्यांचे पत्रे ठोकून वेदी मढव, कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे पवित्र आहेत; ह्या प्रकारे ती इस्राएल लोकांना ताकीद दिल्याची चिन्हे होतील.”


कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.”


तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.


तर ती तुमच्या-आमच्यामध्ये व आमच्यामागून आमच्या व तुमच्या पिढ्यांमध्ये साक्ष व्हावी, ह्यासाठी की आम्ही होमबली, यज्ञबली व शांत्यर्पणे करून परमेश्वरासमोर उपासना करावी, म्हणजे परमेश्वराशी तुम्हांला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना म्हणू नये.


तो इस्राएल लोकांना म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपापल्या वडिलांना विचारतील, ‘ह्या धोंड्यांचे महत्त्व काय?’


यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे एकेक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या,


Lean sinn:

Sanasan


Sanasan