Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक लवकर लवकर पार उतरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांस सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक घाईघाईने पार उतरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मोशेने यहोशुआला सुचविल्याप्रमाणे, याहवेहने यहोशुआला ज्या आज्ञा होत्या, त्या पूर्ण होईपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देन नदीच्या मध्यभागी उभे राहिले, तेव्हा लोकांनी घाईने नदी ओलांडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 4:10
14 Iomraidhean Croise  

मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लावला नाही.


त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती, तिच्या बेखमीर भाकरी भाजल्या, तिच्यात काही खमीर नव्हते; मिसर देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबायला अवकाश मिळाला नाही; त्यांना खाण्यासाठी काही तयार करून घेता आले नाही.


उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही.


जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्‍याची त्रेधा उडणार नाही.’


(कारण तो म्हणतो : “अनुकूल समयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले.” पाहा, आताच ‘समय अनुकूल आहे;’ पाहा, आताच ‘तारणाचा दिवस’ आहे.)


मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवीय याजक आणि इस्राएल लोकांचे सगळे वडील ह्यांच्या स्वाधीन केले.


तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले.


अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल.”


झाडून सारे लोक उतरून गेल्यावर त्यांच्यादेखत परमेश्वराचा कोश आणि याजक पलीकडे गेले.


तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा धोंडे उभे केले; ते आजपर्यंत तेथे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan