Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कराराचा कोश वाहणार्‍या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांना सांग, ‘जेव्हा तुम्ही यार्देन नदीच्या पाण्याच्या काठावर पोहोचाल तेव्हा जा व नदीत उभे राहा.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 3:8
20 Iomraidhean Croise  

एलीया त्याला म्हणाला, “परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवत आहे. तू येथेच थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते दोघे पुढे चालले.


त्यांनी आपल्या भाऊबंदांना एकत्र जमवून स्वतःस पवित्र केले, आणि परमेश्वराच्या वचनानुसार राजाने आज्ञा केली होती तिच्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराच्या शुद्धीसाठी ते मंदिरात गेले.


मग हिज्कीयाने वेदीवर होमबली अर्पण करण्याची आज्ञा दिली. होमार्पणास आरंभ झाला तेव्हा परमेश्वराच्या स्तोत्रासही आरंभ झाला, आणि कर्णे व इस्राएलाचा राजा दावीद ह्याची वाद्ये वाजू लागली.


मग हिज्कीया राजा व सरदार ह्यांनी लेव्यांना आज्ञा केली की दावीद व आसाफ द्रष्टा ह्यांची कवने गाऊन परमेश्वराची स्तुती करा. तेव्हा त्यांनी आनंदाने स्तुती केली व आपली मस्तके लववून आराधना केली.


आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.


मग मी लेव्यांना आज्ञा केली की, ‘शब्बाथ दिवस पवित्र मानून पाळावा म्हणून तुम्ही शुद्ध होऊन वेशीवर पहारा करण्यास येत जा.’ हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझ्या ह्याही कामगिरीचे स्मरण ठेव, आणि तुझ्या विपुल दयेस अनुसरून माझा बचाव कर.


मुख्य याजक एल्याशीब ह्याचा पुत्र योयादा ह्याच्या पुत्रांपैकी एक जण सनबल्लट होरोनी ह्याचा जावई होता; मी त्याला आपल्याजवळून हाकून लावले.


मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत.


परमेश्वरापासून येणार्‍या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे.


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले, आणि सर्व इस्राएल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे निघून गेले.


त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की, “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश लेवीय याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हालवून त्याच्या पाठोपाठ जा;


परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल.


मग यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याची वचने ऐका.”


झाडून सारे लोक उतरून गेल्यावर त्यांच्यादेखत परमेश्वराचा कोश आणि याजक पलीकडे गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan