Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्‍याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 वरून वाहत येणारे पाण्याचे प्रवाह थांबले. सारेथान जवळील आदाम नावाच्या गावात खूप अंतरावर पाण्याची एक रास झाली, तर अराबाच्या समुद्राकडे (म्हणजे मृत समुद्रात) वाहणारे पाणी पूर्णपणे कापले गेले. तेव्हा लोक यरीहो समोर नदीपलीकडे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 3:16
31 Iomraidhean Croise  

हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्‍यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र.


तानख, मगिद्दो आणि बेथ-शानचा अवघा प्रदेश म्हणजे सारतानाजवळील इज्रेलाखालचा बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत आणि यकमामाच्या पलीकडच्या बाजू-पर्यंत असलेला प्रदेश ह्यांत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता;


राजाने ती यार्देन खोर्‍यात सुक्कोथ व सारतान ह्यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतवली होती.


हे पाहून समुद्र पळाला; यार्देन मागे हटली.


हे समुद्रा, तुला काय झाले म्हणून तू पळतोस? हे यार्देने, तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस?


परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो; परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे.


तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो; महासागराचे निधी साठवतो.


त्याने समुद्राची कोरडी भूमी केली; ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठायी हर्ष पावलो.


तू झरा खोदून जलप्रवाह बाहेर काढलास; तू निरंतर वाहणार्‍या नद्या सुकवून टाकल्यास.


समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाहीत.


त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यांना पार नेले; त्याने पाणी राशीसारखे उभे केले.


मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून समुद्र मागे हटवला, त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली.


इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले.


पण इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले; आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले.


तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकराने जलांच्या राशी बनल्या जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले, गहिरे जल सागराच्या उदरी थिजून गेले.


मी आलो तेव्हा कोणी नव्हता; मी हाक मारली तेव्हा जबाब द्यायला कोणी नव्हता, ते का? मुक्त करवत नाही इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? माझ्या ठायी सोडवण्याचे सामर्थ्य नाही काय? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, नद्यांचे रान करतो; पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्यांची घाण येते, ते पाण्यावाचून मरतात.


तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते.


तो समुद्रास दटावून आटवतो, सर्व नद्या कोरड्या करतो; बाशान व कर्मेल त्याच्यापुढे म्लान होतात, लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.


परमेश्वर नद्यांवर रागावला आहे काय? नद्यांवर तुझा राग पेटला आहे काय? तुझा क्रोध समुद्रावर खवळला आहे काय? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास काय?


तेव्हा तुमचा दक्षिण विभाग त्सीन रानापासून अदोम देशाच्या सरहद्दीपर्यंत असावा, आणि तुमची दक्षिण सीमा क्षार समुद्राच्या टोकाच्या पूर्वेपासून सुरू व्हावी;


यार्देनेच्या पूर्वेस रानातील अराबात सूफासमोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब ह्यांच्या दरम्यान जी वचने मोशे सर्व इस्राएलांशी बोलला ती ही.


तसाच किन्नेरेथापासून अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र येथवर पिसगाच्या उतरणीच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.


आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;


त्यांच्या दक्षिण सीमेस क्षार समुद्राच्या दक्षिणेकडील खाडीपासून आरंभ झाला;


यानोहा येथून ती अटारोथ व नारा येथे उतरून यरीहोपाशी यार्देनेवर निघते.


अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल.”


तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल ह्या यार्देनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार आले.’


इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देनेपलीकडील अमोर्‍यांच्या सर्व राजांनी व समुद्र-किनार्‍याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही.


त्यांनी ती तीनशे रणशिंगे फुंकली तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तलवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालवली; तेव्हा ती सेना सरेराजवळच्या बेथ-शिट्टापर्यंत व टब्बाथाजवळच्या आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan