Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 24:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला; त्याला त्यांनी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिनहास ह्याला दिलेल्या गिबा गावी मूठमाती दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 आणि अहरोनाचा पुत्र एलाजार मेला, तेव्हा त्याचा पुत्र फिनहास याची टेकडी जी एफ्राइमाच्या डोंगरवटीत, त्यास दिली होती, तिजवर त्यांनी त्यास पुरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 अहरोनाचा पुत्र एलअज़ार मरण पावला आणि त्याला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गिबियाह येथे पुरण्यात आले. जे त्याचा पुत्र फिनहासला वतन म्हणून देण्यात आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 24:33
22 Iomraidhean Croise  

हा प्रकार काही तसा नव्हे. एफ्राईम डोंगरातल्या शबा बिन बिक्री नावाच्या एका माणसाने दावीद राजावर हात उचलला आहे; तेवढा माणूस आमच्या स्वाधीन करा म्हणजे मी नगर सोडून जाईन.” ती स्त्री यवाबाला म्हणाली, “त्या माणसाचे शिर तटावरून तुझ्याकडे फेकू.”


त्यांची नावे ही : एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशात बेन-हूर;


गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने आपणास असे सांगायला पाठवले आहे की, ‘एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत; त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी व दोन पोशाख द्या.”’


बिन अबीशूवा बिन फिनहास बिन एलाजार बिन अहरोन मुख्य याजक होता.


मला ठाऊक आहे की तू मला मृत्युवश करशील; सर्व जीवधारी ज्या स्थळी एकत्र होणार आहेत त्याप्रत मला पोचवशील.


कारण तो पाहतो की, ज्ञानी मरतात, तसेच मूढ व पशुतुल्य नष्ट होतात, आणि आपले धन दुसर्‍यांना ठेवून जातात.


अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीशेबा बायको केली; तिच्यापासून त्याला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.


अहरोनाचा मुलगा एलाजार ह्याने पुटीएलाच्या मुलींपैकी एक बायको केली; तिच्यापासून त्याला फिनहास झाला. त्यांच्या-त्यांच्या घराण्यांप्रमाणे लेव्यांच्या पूर्वजांचे प्रमुख पुरुष हेच.


तुमचे पूर्वज आता कोठे आहेत? संदेष्टे तरी सर्वकाळ जगतात काय?


लेव्यांच्या सरदारांचा सरदार अहरोनाचा मुलगा एलाजार हा असावा; पवित्रस्थानाच्या वस्तूंचे रक्षण करण्याची कामगिरी ज्यांच्याकडे सोपवलेली आहे त्यांच्यावर त्याची देखरेख असावी.


कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला;


पण हा ‘युगानुयुग’ राहणारा असल्यामुळे ह्याचे याजकपण अढळ आहे.


एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएली वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी ही वतने इस्राएल लोकांना कनान देशात वाटून दिली.


मग इस्राएल लोकांनी रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे गिलाद देशात एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याला पाठवले;


आपल्याला कोठेतरी राहायला जागा मिळाली तर पाहावे म्हणून तो यहूदातील बेथलेहेम नगर सोडून निघाला; आणि प्रवास करत करत एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरी आला.


तेथून निघून ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घराजवळ आले.


आणि अहरोनाचा नातू, एलाजाराचा मुलगा फिनहास हा त्या काळी त्या कोशाच्या सेवेस असे.) लोकांनी परमेश्वराला विचारले, “आमचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्याशी लढायला पुन्हा एकदा जावे काय? किंवा लढण्याचे सोडून द्यावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “चाल करून जा; कारण उद्या मी त्यांना तुमच्या हाती देईन.”


एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते.


त्याने एफ्राइमाचा डोंगरी प्रदेश व शलीशा प्रांत पायांखाली घातला तरी ती त्याला सापडली नाहीत; मग ते शालीम प्रांतात गेले तेथेही ती नव्हती; नंतर ते बन्यामिन्यांच्या प्रांतात गेले तेथेही त्यांचा पत्ता लागला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan