Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 24:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ह्या गोष्टी यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्रस्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तेव्हा यहोशवाने ही वाक्ये देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिली, आणि मोठी धोंड घेऊन, तेथे परमेश्वराच्या पवित्र स्थानी जे एला झाड, त्याच्याखाली ती उभी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तेव्हा यहोशुआने या सर्व गोष्टींची नोंद परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात केली. नंतर त्याने एक मोठी धोंड घेतली आणि याहवेहच्या पवित्रस्थानाजवळ एला वृक्षाखाली ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 24:26
10 Iomraidhean Croise  

तेव्हा याकोबाने एक धोंडा घेऊन त्याचा स्तंभ उभारला.


तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व परके देव आणि त्यांच्या कानांत असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली; आणि याकोबाने शखेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली ती पुरून टाकली.


रिबकेची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूस अल्लोन वृक्षाखाली पुरले; ह्या वृक्षाचे अल्लोन-बाकूथ (रुदनवृक्ष) असे नाव ठेवले.


मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली. अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी त्याने एक वेदी बांधली, आणि इस्राएलाच्या बारा वंशांप्रमाणे बारा स्तंभ उभारले.


तेव्हा शखेमातील सर्व प्रमुख नागरिक आणि बेथ-मिल्लो येथील सर्व लोक एकत्र झाले, व त्यांनी शखेमाच्या स्तंभाजवळील मोठ्या वृक्षाजवळ अबीमलेखाला राजा केले.


मग शमुवेलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन ह्यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन-एजर हे नाव देऊन म्हटले की, “येथवर परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan