Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 24:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मी तुमच्या आघाडीस गांधीलमाशा पाठवल्या व त्यांनी अमोर्‍यांचे दोन राजे तुमच्यापुढून हाकून दिले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवल्या, आणि त्यांनी त्यांना तुमच्यासमोरून घालवले; अमोऱ्याचे दोन राजे यांना घालवले; तुझ्या तलवारीने व धनुष्यानेही हे झाले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठविल्या व त्यांनी त्यांना व दोन अमोरी राजांना तुमच्यापुढून घालवून दिले. हे तुमच्या तलवारीने आणि धनुष्य बाणांनी केले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 24:12
13 Iomraidhean Croise  

अमोर्‍यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला;


त्याच्या छायेने पर्वत, आणि त्याच्या फांद्यांनी देवाचे गंधसरू आच्छादित झाले.


तू त्यासाठी जागा तयार केलीस आणि त्याने मूळ धरून देश व्यापला.


मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळायला लावतील.


तांबड्या समुद्रापासून ते पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदापर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करीन; मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन व तू त्यांना आपल्यापुढून हाकून देशील.


ह्याप्रमाणे इस्राएल लोक अमोर्‍यांच्या देशात वस्ती करून राहिले.


मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठवले; इस्राएल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोर्‍यांना देशाबाहेर हाकून लावले.


परमेश्वराने अमोर्‍यांचे राजे सीहोन व ओग ह्यांचा व त्यांच्या प्रदेशाचा संहार केला तसाच ह्यांचाही करील.


मिसर देशातून बाहेर आल्यावर मोशे आणि इस्राएल लोकांनी जो हेशबोननिवासी अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला पराजित केले, त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस बेथपौराच्या समोरील खोर्‍यात हे सांगण्यात आले;


आणि त्याचा देश व बाशानाचा राजा ओग ह्याचा देश त्यांनी काबीज केला; हे दोघे अमोर्‍यांचे राजे यार्देनेच्या पूर्वेस राहत असत.


ह्याखेरीज तुझा देव परमेश्वर त्यांच्यामध्ये गांधीलमाशा पाठवील, मग त्यांच्यापैकी जे वाचले असतील आणि तुझ्यापासून लपले असतील त्यांचाही नाश होईल.


कारण तुम्ही मिसर देशाहून निघालात तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोर्‍यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan