Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 24:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हा यरीहोचे मालक, अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, ह्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “ ‘नंतर तुम्ही यार्देन नदी ओलांडून यरीहोकडे आला. यरीहोचे रहिवासी तुमच्याविरुद्ध लढले, तसेच अमोरी, परिज्जी, कनानी, हिथी, गिर्गाशी, हिव्वी आणि यबूसी हे सुद्धा लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 24:11
25 Iomraidhean Croise  

केनी, कनिज्जी, कदमोनी,


त्याने त्यांना परक्या राष्ट्रांचे देश दिले; त्या लोकांच्या श्रमाचे फळ ह्यांच्या हाती आले,


हे पाहून समुद्र पळाला; यार्देन मागे हटली.


हे समुद्रा, तुला काय झाले म्हणून तू पळतोस? हे यार्देने, तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस?


कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी ह्यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर ह्या महिन्यात तू हा सण पाळावा.


जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा संहार करीन,


मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळायला लावतील.


तांबड्या समुद्रापासून ते पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदापर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करीन; मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन व तू त्यांना आपल्यापुढून हाकून देशील.


मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, तुम्हांला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


मी तुझ्यापुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांना तेथून घालवून देईन.


नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली.


जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ‘ताब्यात घेतला’, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला.


जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल;


यहोशवा म्हणाला, “जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी गिर्गाशी, अमोरी व यबूसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल हे येणेप्रमाणे तुम्हांला कळून येईल :


राष्ट्रातील झाडून सारे लोक यार्देनेपलीकडे गेल्यावर परमेश्वर यहोशवाला म्हणाला,


पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे डेरे दिले.


आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तो आटवून कोरडा केला होता, त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली.


एकोपा करून यहोशवा व इस्राएल ह्यांच्याशी लढायला जमा झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan