यहोशवा 23:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका; त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांची शपथ कोणाला वाहायला लावू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली आहेत त्यांमध्ये तुम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवांच्या नावांची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाही करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमच्यामध्ये जी उर्वरित राष्ट्रे आहेत त्यांच्याशी संगती करू नका; त्यांच्या दैवतांची नावे घेऊ नका किंवा त्यांची शपथही घेऊ नका. तुम्ही त्यांची सेवा करू नये किंवा त्यांना नमन करू नये Faic an caibideil |
परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची मात्र क्षमा करावी; म्हणजे माझा धनी रिम्मोन दैवताच्या मंदिरात पूजा करायला जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो, आणि रिम्मोन दैवताच्या मंदिरात गेल्यावर त्याला मी नमन करत असतो; ह्याप्रमाणे रिम्मोनाच्या मंदिरात जाऊन मी त्याला नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी.”